जिल्ह्यात रविवारी कोरोनाने दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:31 IST2021-01-13T05:31:44+5:302021-01-13T05:31:44+5:30

रविवारी ४१६ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ४० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत एक लाख ...

Two were killed by a corona in the district on Sunday | जिल्ह्यात रविवारी कोरोनाने दोघांचा मृत्यू

जिल्ह्यात रविवारी कोरोनाने दोघांचा मृत्यू

रविवारी ४१६ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ४० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत एक लाख ९ हजार ४९ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात १२७७३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

जिल्ह्यात रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील नऊ, मोहाडी चार, तुमसर आठ, पवनी एक, लाखनी ११, साकोली सात व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत १२०५७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या १२७७३ झाली असून ४११ क्रियाशील रुग्ण आहेत. रविवारी कोरोनाच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण ३०५ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३९ टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर ०२.३९ टक्के एवढा आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

Web Title: Two were killed by a corona in the district on Sunday