शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या शेतात बिबट्याचे दोन नवजात बछडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST

परसटोला येथील हरिश्चंद्र डोंगरवार यांच्या शेतात ऊसाची लागवड करण्यात आली आहे. मंगळवारी या ऊसाच्या मळ्यात ऊस तोडणी कामगार गेले. त्यावेळी त्यांना बिबट्याचे दोन नवजात बछडे आढळून आले. याबाबत कामगारांनी शेतमालकाला माहिती दिली. त्यांनी तात्काळ वनविभागाला याप्रकरणी माहिती दिली.

ठळक मुद्देपरसटोलाची घटना : १४ वनकर्मचारी तैनात, परिसरात आठ ट्रॅप कॅमेरे

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : ऊसाच्या शेतात बिबट्याचे दोन नवजात बछडे आढळल्याची घटना लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत परसटोला येथे उघडकीस आली. दोन नवजात बछडे असल्याने आसपास बिबट्याचा संचार असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या बछड्यांच्या सुरक्षेसाठी १४ वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.परसटोला येथील हरिश्चंद्र डोंगरवार यांच्या शेतात ऊसाची लागवड करण्यात आली आहे. मंगळवारी या ऊसाच्या मळ्यात ऊस तोडणी कामगार गेले. त्यावेळी त्यांना बिबट्याचे दोन नवजात बछडे आढळून आले. याबाबत कामगारांनी शेतमालकाला माहिती दिली. त्यांनी तात्काळ वनविभागाला याप्रकरणी माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी ए.जी. मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार या शेतातील ऊस तोडणी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. दोन बछड्यांना वनविभागाद्वारे संरक्षण देण्यात आले आहे. परिसरात आठ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यावरून मादी बिबट व पिलांवर नजर ठेवण्यात येत आहे.मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास मादी बिबट पिलाजवळ आली. दूध पाजून ती टेहळणी करीत दुसरीकडे निघून गेल्याचे मेश्राम यांनी सांगितले. या परिसरात वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाचे १४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यात क्षेत्र सहाय्यक यशवंत तांडेकर, उमरझरी बीट रक्षक आर.डी. कोदाने, पिटेझरी बीट रक्षक सविता रंगारी, सोनेगाव बीट रक्षक आर.बी. पडोळे आदी कर्मचारी बिबट्याच्या बछड्यांवर नजर ठेवून आहेत. सहाय्यक उपवनसंरक्षक राठोड यांनी घटनास्थळाला भेट दिली.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग