तुकडा येथे दोन घरांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:00:51+5:30

तुकडा येथे विलास फुलचंद साठवणे व विनोद फुलचंद साठवणे या दोनही भावाचे घर अगदी शेजारी आहे. गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका घराला आग लागली. शेजाऱ्यांना आगीच्या ज्वाला दिसल्या. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला. साठवणे कुटुंबिय जागे झाले. परंतु घरातून बाहेर निघणे कठीण झाले होते.

Two houses on fire at the Tukada | तुकडा येथे दोन घरांना आग

तुकडा येथे दोन घरांना आग

ठळक मुद्देपाच लाखांचे नुकसान : दोनही कुटुंबातील सहा जण बचावले

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील तुकडा येथे गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन घरे भस्मसात झाले. या आगीत दोनही कुटुंबाचे पाच लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या दोनही कुटुंबातील सहा जण थोडक्यात बचावले. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.
तुकडा येथे विलास फुलचंद साठवणे व विनोद फुलचंद साठवणे या दोनही भावाचे घर अगदी शेजारी आहे. गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका घराला आग लागली. शेजाऱ्यांना आगीच्या ज्वाला दिसल्या. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला. साठवणे कुटुंबिय जागे झाले. परंतु घरातून बाहेर निघणे कठीण झाले होते. शेजाऱ्यांनी मोठ्या हिमतीने सहा जणांना दोन घरातून बाहेर काढले आणि काही क्षणातच दोनही घराचे छत कोसळले. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य मंगेश मानापुरे, गणेश देशमुख, पृथ्वीराज मानापुरे, रवींद्र देशमुख, रूपेश मानापुरे आदी धावून आले. तुमसर पोलिसांना माहिती देण्यात आली. नगरपरिषदेचे अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग नियंत्रणात आली.

Web Title: Two houses on fire at the Tukada

टॅग्स :fireआग