शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
3
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
4
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
5
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
6
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
7
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
8
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
9
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
10
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
11
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
12
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
13
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
14
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
15
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
16
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
17
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
18
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
19
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
20
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
Daily Top 2Weekly Top 5

नाकाडोंगरी धान केंद्रावरील बोनसचे अडीच कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

सध्या शेतकऱ्यांचे धान पेरणीचा हंगाम सुरु झाला असून या कालावधीत शेतकऱ्यांना बि बियाणे, खते खरेदीसाठी पैसे तात्काळ जमा करणे गरजेचे आहे. नाकाडोंगरी लगतच्या गर्रा बघेडा, डोंगरी बु., आष्टी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची पूर्ण रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बोनसची मागणी जोर धरत आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : ३५ हजार ७६४ क्विंटलची खरेदी

राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील नाकाडोंगरी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची बोनस रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या खरीप हंगामाची कामे सुरु असल्याने शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता भासत आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना आधीच विविध संकटाचा सामना करावा लागत असताना धान खरेदी केंद्रावरुन बोनसची रक्कम अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने तात्काळ बोनसची रक्कम जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
तालुक्यातील विकास सेवा सहकारी संस्था नाकाडोंगरी अंतर्गत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते.
सदर धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत ३५ हजार ७६४ क्विंटल शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले आहे.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार १८१५ प्रती क्विंटल प्रमाणे शेतकऱ्यांना रक्कम देण्यात आली आहे. मात्र खरेदी केलेल्या धानाच्या बोनसची एकुण रक्कम दोन कोटी ५० लाख ३५ हजार ८० शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेली नाही.
सध्या शेतकऱ्यांचे धान पेरणीचा हंगाम सुरु झाला असून या कालावधीत शेतकऱ्यांना बि बियाणे, खते खरेदीसाठी पैसे तात्काळ जमा करणे गरजेचे आहे. नाकाडोंगरी लगतच्या गर्रा बघेडा, डोंगरी बु., आष्टी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची पूर्ण रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बोनसची मागणी जोर धरत आहे.

शेतकऱ्यांची व्यथा समजून त्यांना तात्काळ बोनसची रक्कम शासनाने दिली पाहिजे. याबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवदेन दिले आहे.
-कृष्णकांत बघेल,
माजी सरपंच गोबरवाही.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड