शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वरठी-पांढराबोडी रस्ता पुन्हा बंद

By admin | Updated: October 1, 2014 23:18 IST

वरठी-पांढराबोडी रस्त्यावर तारांचे कुंपण घातल्यामुळे रस्ता बंद होण्याच्या स्थितीत आहे. कुंपणामुळे अर्ध्यापेक्षा रस्ताचा जास्त भाग बंद झाला आहे. २०११ मध्ये मनोहर मदनकर यांनी अतिक्रमण केले

चार वर्षानंतर पुन्हा अतिक्रमण : रस्ता मोकळा करून देण्याची मागणीवरठी : वरठी-पांढराबोडी रस्त्यावर तारांचे कुंपण घातल्यामुळे रस्ता बंद होण्याच्या स्थितीत आहे. कुंपणामुळे अर्ध्यापेक्षा रस्ताचा जास्त भाग बंद झाला आहे. २०११ मध्ये मनोहर मदनकर यांनी अतिक्रमण केले म्हणून जिल्हा परीषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण पाडले होते. तीन वर्षानंतर त्याच भागात पुन्हा तारांचा कंपाऊंड केल्यामुळे परिसरातील रहिवासी यांच्यासह पांढराबोडी वासियांना त्रास होत आहे. रस्ता अतिक्रमणमुक्त करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.वरठी-पांढराबोडी रस्ता हा मोहाडी-भंडारा तालुक्याच्या सिमेवर आहे. जगनाडे चौकातून भारत गॅस एजंसी जवळून अनेक वर्षापासून या रस्त्यावरून रहदारी सुरू होती. या मार्गावर वरठी, सिरसी, पांढराबोडी, बीड, एकलारी येथील नागरिकांची शेती आहे. पांढराबोडी व सनफ्लॅग कॉलोनीला जाण्याकरीता एकमेव रस्ता आहे. दररोज शेकडो विद्यार्थी या मार्गावरून आवागमन करत असून स्वातंत्र्यापूर्व काळापाूसन सदर रस्त्यावरून रहदारी सुरू होती.पांढराबोडी येथून वरठीला येण्याकरीता एकमेव जवळचा रस्ता आहे. भंडाऱ्याला जाण्याकरिता 'शॉर्टकट' रस्ता म्हणून शेकडो दुचाकीस्वार या रस्त्याचा वापर करतात. पांढराबोडी येथे दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. हा रस्ता बंद झाल्यास पांढराबोडीला जाण्याकरिता भंडारा येथून उलट मार्गाने जावे लागेल. रस्त्याच्या पलीकडे भंडारा तालुक्यातील सिरसी गावाच्या हद्दीत मोडणारी ५० घरांची वस्ती आहे. त्यांना जाण्या-येण्याचा मार्ग नाही. एकंदरीत या रस्त्याच्या वादात गावकरी व विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास होत आहे. पण बदलत्या काळात सिमेंटच्या जंगलात हा रस्ता अदृश्य झाल्याचे दिसते. अतिक्रमण कोणी केले हा शोध घेऊन लवकरात लवकर रस्ता मोकळा करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)