शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटात क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST

कोरोनाचा कहर सर्वत्र माजला असून विदर्भातील नागपूर येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने पूर्व विदर्भातील आरोग्य व प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्य शासनाने सरकारी सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहे, गर्दी करणे टाळणे अशा सूचना दिल्या आहे, परंतु शालेय शिक्षण क्रीडा विभागाने मात्र शिक्षकांचे प्रशिक्षण सुरुच ठेवले आहे.

ठळक मुद्देफिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत प्रशिक्षण : शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोना विषाणूच्या संसर्गाची जगात भीती व्यक्त होत असून गर्दी टाळण्याचे आदेश केंद्र व राज्य शासनाने दिले आहे. परंतु क्रीडा विभागाचे फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत शिक्षकांचे एक दिवशीय प्रशिक्षण तुमसरात शुक्रवारी आयोजित केले होते. या प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणात शिक्षकांनी हजेरी लावली होती.कोरोनाचा कहर सर्वत्र माजला असून विदर्भातील नागपूर येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने पूर्व विदर्भातील आरोग्य व प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्य शासनाने सरकारी सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहे, गर्दी करणे टाळणे अशा सूचना दिल्या आहे, परंतु शालेय शिक्षण क्रीडा विभागाने मात्र शिक्षकांचे प्रशिक्षण सुरुच ठेवले आहे.शुक्रवारी तुमसर येथे आरएसजीके शाळेत फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शिक्षकांचे एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. यात पुरुष व महिला शिक्षकांचा समावेश होता.सदर प्रशिक्षणात प्राजेकटरची व्यवस्था केली होती. आॅनलाईन माहिती थेट केंद्र सरकारला शालेय विद्यार्थ्यांची खेळासंदर्भात पाठवायची आहे. यासंदर्भात सदर प्रशिक्षण देण्यात आले.एका सभागृहात प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती. सध्या वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकला व पडसे साधारणत: लोकांना आहे.प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांमध्ये कोरोनाची चर्चा प्रशिक्षणात सुरु होती. पुन्हा भंडारा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सदर प्रशिक्षण होत आहे. यात भंडारा, लाखनी, साकोली, लाखांदूर, मोहाडी येथे होणार असून पवनी व तुमसर येथे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.शिक्षण विभागाचे दुर्लक्षशालेय शिक्षण विभाग व क्रीडा संचालयाने प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. परंतु सद्याची परिस्थिती पाहता गर्दी टाळणे गरजेचे आहे. तालुक्यातील शेकडो शिक्षक प्रशिक्षणादरम्यान एकत्र किमान चार ते पाच तास बसत आहेत. त्यामुळे भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशिक्षण तात्काळ बंद करण्याची गरज आहे.शिक्षकांत चर्चाकोरोनाचा धसका घेतला गेला आहे. शिक्षण व क्रीडा विभाग येथे धडक प्रशिक्षण कार्यक्रम राबवित आहे. परिस्थितीनुसार त्यात बदल करण्याची चर्चा प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांची सुरु होती.

टॅग्स :corona virusकोरोनाTeacherशिक्षक