शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

किन्ही गावाची १०० टक्के लसीकरणाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 05:00 IST

कोरोना विरुद्धचा लढा  जिंकण्यासाठी शासनाकडून आरोग्य विभागाच्या पुढाकाराने टप्प्याटप्प्याने सर्वत्र लसीकरण मोहीम राबविली गेली. मात्र ग्रामीण भागात लसीकरण विषयी पसरलेल्या विविध अफवांमुळे जनतेच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर सारून १०० टक्के लसीकरण पूर्तीचे ध्येय गाठण्याच्या हेतूने तालुका आरोग्य प्रशासनाच्या पुढाकाराने तालुक्यात व्यापक स्तरावर लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात आली. 

ठळक मुद्देआरोग्य विभागाचे यश : अफवांच्या पार्श्वभूमीवर ठेवला आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कविरली(बु.) : ग्रामीण भागात कोरोना लसीविषयी पसरलेल्या विविध अफवांच्या पार्श्वभूमीवर लाखांदूर तालुक्यातील किन्ही / गुंजेपार  या छोट्याशा खेडेगावाची १०० टक्के लसीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. या गावाने इतरांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेचे हे यश आहे.राबविण्यात आलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेत गावातील ४५ वर्षांवरील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. लसीच्या पहिल्या डोससाठी ९५ टक्के लसीकरण पूर्ण झाले होते.  ९ जूनला घेण्यात आलेल्या लसीकरण शिबिरात दुसऱ्या डोससाठी ४५ वर्षांवरील ९५ टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोना विरुद्धचा लढा  जिंकण्यासाठी शासनाकडून आरोग्य विभागाच्या पुढाकाराने टप्प्याटप्प्याने सर्वत्र लसीकरण मोहीम राबविली गेली. मात्र ग्रामीण भागात लसीकरण विषयी पसरलेल्या विविध अफवांमुळे जनतेच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर सारून १०० टक्के लसीकरण पूर्तीचे ध्येय गाठण्याच्या हेतूने तालुका आरोग्य प्रशासनाच्या पुढाकाराने तालुक्यात व्यापक स्तरावर लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नागरिकांसाठी बारव्हा येथील आरोग्य उपकेंद्रात लस उपलब्ध करून देण्यात आली होती. या गावात ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या जवळपास २१० असून आरोग्य प्रशासनाच्या आकडेवारीनुसार येथे ४५ वर्षांवरील ९५ टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस  घेतले आहेत.  अपवाद वगळता सर्वच युवकांनी आपले दोन्ही डोस पूर्ण केल्याची माहिती येथील ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपाचे तालुका महामंत्री शुभम चिरवतकर यांनी दिली.    मोहिमेसाठी आरोग्य विभागाच्या एम. बी. खोब्रागडे, आर. आर. बरडे, विरली (बु.) जि. प. शाळेचे मुख्याध्यापक जी. एम. वंजारी, ग्रामपंचायत सदस्य शुभम चिरवतकर, राजेंद्र तुपटे,  रिना भागडकर, आशा सेविका जया नंदागवळी ,  तिलकचंद शहारे, पुरुषोत्तम चिरवतकर, लेकराम भागडकर, शंकर तरारे, सोमेश्वर शहारे, विनायक तरारे, मच्छिंद्र शहारे, शरद शहारे, नकटू शहारे, दशरथ शहारे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या