शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना ‘जय’, ‘चांदी’ची भुरळ

By admin | Updated: February 29, 2016 00:21 IST

नदी, नाले, डोंगर, दऱ्या व शेकडो औषधी वनस्पतीच्या प्रजातीने परिपूर्ण असलेले उमरेड कऱ्हांडला पवनी अभयारण्य पर्यटकांच्या पसंतीला उतरत असताना जय, चांदीच्या ओढीने अभयारण्य चर्चेत आहे.

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य : रोजगाराच्या संधी, वनविभागाच्या महसुलात वाढअशोक पारधी पवनीनदी, नाले, डोंगर, दऱ्या व शेकडो औषधी वनस्पतीच्या प्रजातीने परिपूर्ण असलेले उमरेड कऱ्हांडला पवनी अभयारण्य पर्यटकांच्या पसंतीला उतरत असताना जय, चांदीच्या ओढीने अभयारण्य चर्चेत आहे. सोशल मिडीया वर शेअर झालेल्या चित्रफितीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने अभयारण्याकडे धाव घेऊ लागले आहेत.रविवार तर बुकींग मिळाली नही म्हणून नैराश्य मिळालेल्या पर्यटकांसाठी अभयारण्याऐवजी गोसीखुर्द प्रकल्पस्थळ पर्यटनस्थळी निवडण्याची वेळ अनेकांवर येत आहे. पवनी खापरी प्रवेशद्वारावर सकाळी ६ वाजेपासून पर्यटकांची रिघ लागलेली असते. पर्यटकांच्या सोयीसाठी पवनी येथील निसर्गप्रेमींनी जीप्सी उपलब्ध करून देण्यासाठी चढाओढ सुरु केल्यामुळे पुरेशा जिप्सी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे खुल्या जिप्सीमधून घनदाट जंगलाचा मनमुराद आनंद घेण्याचा लाभ पर्यटकांना मिळत आहे.राजकारणातील व्हीआयपी, प्रसिद्ध क्रिकेटपटू, सिनेकलावंत यांच्या हजेरीमुळे पर्यटकांत जय, चांदीचे आकर्षण वाढलेले आहे. सोबतच त्यांचे दोन बछडे पाहण्याचा योग पर्यटकांना या अभयारण्यात येत आहे. जंगलात मोह, सागवान, खैर, आवळा, बेहडा, भेरा, डिकामाली, बांबू, येन, पळस, टेंभर्णी, गराडी अशा शेकडो प्रजातींचे वृक्ष पर्यटकांना आकर्षून घेत आहेत. सोबतच मोर, काळवीट, बिबट, ससे, हरिण, रानगवा व विविध प्रकारचे पक्षी जंगलात पाहावयास मिळत असल्याने पर्यटक वाढले आहेत. प्रकल्पबाधीत क्षेत्रातील युवकांना प्रशिक्षित करून गाईड नियुक्त करण्यात आलेले आहे. पवनी गेटवर प्रतिक्षालय झाले. अन्य सुविधा कराव्या अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.