शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
6
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
7
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
8
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
9
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
10
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
11
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
12
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
13
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
14
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
15
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
18
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
19
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
20
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मॅग्निज खाणीतील मजुरांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

चिखला व डोंगरी बु. खाणीत कंत्राटदार मजुराची संख्या सुमारे १५० इतकी आहे. खाणी लॉकडाऊन झाल्यानंतर मागील तीन आठवड्यापासून मजुरांना कंत्राटदारांनी वेतन दिले नाही. याप्रकरणी मजुरांनी कंत्राटदारांन विचारले असता त्यांनी खाणीकडून आम्हाला राशी मिळालेली नाही. त्यामुळे तुम्हाला वेतन देण्यास आम्ही असमर्थ आहोत, अशी भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देतीन आठवड्यांपासून वेतन नाही : चिखलीत व डोंगरी खाणीतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तुमसर तालुक्यातील चिखला व डोंगरी मॅग्निज खाणीतील कंत्राटदाराच्या मजुरांना मागील तीन आठवड्यापासून वेतन मिळाले नाही. केंद्र शासनाने कर्मचारी व मजुरांना वेतन न थांबविण्याचे आदेश दिले असताना केंद्र शासनाच्या खाणीतील मजुरांना वेतन दिले गेले नाही. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
चिखला व डोंगरी बु. खाणीत कंत्राटदार मजुराची संख्या सुमारे १५० इतकी आहे. खाणी लॉकडाऊन झाल्यानंतर मागील तीन आठवड्यापासून मजुरांना कंत्राटदारांनी वेतन दिले नाही. याप्रकरणी मजुरांनी कंत्राटदारांन विचारले असता त्यांनी खाणीकडून आम्हाला राशी मिळालेली नाही. त्यामुळे तुम्हाला वेतन देण्यास आम्ही असमर्थ आहोत, अशी भूमिका घेतली आहे.
कंत्राटदाराकडील मजूर गरीब असून रोजंदारी मजूर म्हणून ते मॅग्निज खाणीत कामे करतात. दररोज कमावून आणणे व खाणे अशी त्यांची स्थिती आहे. इतर कामे बंद आहेत. त्यामुळे सध्या मजुरांची उपासमार होत आहे. मॉईल प्रशासनाने कंत्राटदारांची थकबाकी दिली नाही. हे मुख्य कारण कंत्राटदार मजुरांना सांगत आहेत. जिल्हा परिषद सदस्य संगिता सोनवाने, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी रहांगडाले, सुरेश रहांगडाले, दिलीप सोनवाने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करून मजुरांना तात्काळ वेतन मॉईल प्रशासनाने द्यावा, अशी मागणी केली आहे.
चिखला येथे कंत्राटदास मजुरांची सोशल डिस्टन्सिंग ठेवून सभा झाली. यात मजुरांनी कंत्राटदारांनी वेतन देण्याची एकमुखी मागणी केली तथा जिल्हाधिकाºयांना निवेदन पाठविण्यात आले. चिखला येथे भूमिगत खाण आहे. या भूमिगत खाणीत सदर मजूर जोखमीचे काम करतात. मॉईल प्रशासन भविष्यनिर्वाह निधी जमा करतो. १५ दिवसापर्यंत पुरेल इतके अन्नधान्य त्यांच्याकडे जमा होते. आता अन्नधान्य संपला आहे. मजुरांनी मॉयल प्रबंधकांशी भेटून चर्चा केली. त्यांनी संबंधित कंत्राटदारांना मजूरांचे वेतन देण्यास सांगण्यात आल्याचे सांगितले. परंतु कंत्राटदारानी अजुनपर्यंत मजुरांना वेतन दिले नाही.
केंद्र शासनाच्या खाणीतील मजुरांची उपासमार सुरू असल्याची तक्रार मजुरांनी थेट केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद पटेल यांचेकडे केली आहे. लाकडाऊन संपल्यावर गोबरवाही येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा मजुरांनी दिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही राज्य शासनाकडे यासंदर्भात तक्रार केल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य संगिता सोनवाने, चिखलाचे माजी उपसरपंच दिलीप सोनवाने यांनी दिली.