शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशपूर, पिंडकेपार शिवारात आढळले वाघाचे पगमार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 05:00 IST

गणेशपूर शिवारातील साठवणे यांच्या शेतात तयार केलेल्या गादीवाफ्यात शनिवारी सकाळी वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यांनी ही माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे आणि सरपंच मनीष गणवीर यांना दिली. तसेच वनविभागालाही ही माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत परिसरात शोधमोहीम सुरू झाली. तेव्हा गणेशपूर स्मशानभूमीपासून ते वैनगंगा नदीच्या तिराने पिंडकेपारपर्यंत वाघाचे ठसे आढळून आले.

ठळक मुद्देपाणीपुरवठा विहिरीजवळ वाघाच्या दर्शनाचा दावा : वनविभागाची दिवसभर शोधमोहीम

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरालगतच्या गणेशपूर, पिंडकेपार शिवारात वाघाचे पगमार्क शनिवारी आढळल्याने एकच खळबळ उडाली. वनविभागासह गणेशपूरच्या नागरिकांनी दिवसभर शोधमोहीम राबविली. मात्र, वाघाचा पत्ता लागला नाही. दरम्यान सायंकाळी ७ वाजता गणेशपूर पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ वाघ दिसल्याचा दावा काही जणांनी केला.गणेशपूर शिवारातील साठवणे यांच्या शेतात तयार केलेल्या गादीवाफ्यात शनिवारी सकाळी वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यांनी ही माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे आणि सरपंच मनीष गणवीर यांना दिली. तसेच वनविभागालाही ही माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत परिसरात शोधमोहीम सुरू झाली. तेव्हा गणेशपूर स्मशानभूमीपासून ते वैनगंगा नदीच्या तिराने पिंडकेपारपर्यंत वाघाचे ठसे आढळून आले. वाघ मोठा असल्याचे पगमार्कवरून दिसून येते. वनविभागाच्या रॅपिड ॲक्शन टीमने संपूर्ण परिसर पिंजून काढला; परंतु वाघाचे कुठेही दर्शन झाले नाही. मात्र, सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गणेशपूर पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ वाघ दिसल्याचा दावा मासेमारांनी केला. शोध मोहिमेत यशवंत सोनकुसरे, मनीष गणवीर, मयूर भुरे, शेखर खराबे, बंडू चेटुले यांच्यासह २५ ते ३० तरुण सहभागी झाले होते. जवळपास १ किलोमीटरपर्यंत पगमार्क शोधण्यात आले. सायंकाळी ४.४० वाजता उपवनसंरक्षक शिवराम भलावी यांनी या परिसराची पाहणी केली. तसेच रॅपिड ॲक्शन पथकाला परिसरात गस्त घालण्याचे निर्देश दिले. वाघाचे पगमार्क दिसल्याची माहिती परिसरात होताच एकच खळबळ उडाली. हा वाघ कोका अभयारण्यातून आला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रात्रभर गस्त घातली जाणार असल्याचे वनविभागाने सांगितले.

गणेशपूर, पिंडकेपार शिवारात वाघाचे पगमार्क आढळले. पगमार्कवरून हा वाघ मोठा असावा असे दिसते. वनविभाग शोधमोहीम राबवीत असून जवाहरनगर, कोरंभी, कवडसीपर्यंत शोधमोहीम घेतली जाणार आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याची सूचना दिली.-शिवराम भलावी,               उपवनसंरक्षक भंडारा

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग