शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

थुल यांनी घेतला दावेझरी हत्याकांडाचा आढावा

By admin | Updated: September 2, 2016 00:33 IST

तुमसर तालुक्यातील दावेझरी येथे जादुटोणा केल्याच्या संशयावरून ढोक दाम्पत्यांची काही लोकांनी निर्घृण हत्या केली होती.

मृताच्या मुलांशी केली बातचीत : अधिकाऱ्यांना दिले निर्देशभंडारा : तुमसर तालुक्यातील दावेझरी येथे जादुटोणा केल्याच्या संशयावरून ढोक दाम्पत्यांची काही लोकांनी निर्घृण हत्या केली होती. घटनेची माहिती होताच अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश सी. एल. थुल यांनी आज गुरूवारला दावेझरीचा दौरा करून घटनेचा आढावा घेतला. थुल यांनी यावेळी मृतक ढोक दाम्पत्याच्या कुटुंबांशी चर्चा केली. त्यांना सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्याचा आणि पीडित कुटुंबांचे पुनवर्सन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. दावेझरी येथील दौऱ्यानंतर थुल यांनी आपला अहवाल अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे सोपविणार आहेत. थुल यांनी गुरुवारला दावेझरी येथे पीडित कुटुंबाच्या घराची पाहणी केली. त्यावेळी या घरात कुणीही नव्हते. यावेळी त्यांनी गावातील नागरिकांशी चर्चा केली. या दौऱ्यात त्यांनी तुमसरात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात मृतकाचे दोन्ही मुले उपस्थित होते. त्यापूर्वी थुल यांनी पोलीस अधीक्षक विनीता साहू यांच्याकडून या घटनेची माहिती जाणून घेतली. यासोबतच ग्रामीण भागात अंधश्रद्धेतून घडणाऱ्या घटनांविषयी चिंता व्यक्त केली.दौऱ्या दरम्यान, पीडित कुटुंबाकडे जातीसंबंधीचे प्रमाणपत्र नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांना मृतकाच्या दोन्ही मुलांचे नावे जाती प्रमाणपत्र तातडीने देण्याचे निर्देश दिले. पोलीस प्रशासनाला या घटनेचा खटला जलदगती न्यायालयात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व जमीनीचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. दावेझरी येथे जादुटोणाच्या संशयावररून २७ आॅगस्टच्या मध्यरात्री यादवराव ढोक (६५) आणि कौशल ढोक (५५) यांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी १६ आरोपिना अटक केली आहे. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक विनीता साहू, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी देवसुदन धारगावे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)