तीन भावडांनी शोधला शेतीतून उन्नतीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:01:09+5:30

योग्य नियोजन व स्व:कष्टाच्या भरवशावर स्वप्नीलने अवघ्या तीन एकरात बागायती शेती सोबत झेंडूच्या फुलांची आंतरपिक शेती फुलविली आहे. यातून विविध प्रकारचा भाजीपाला पिकवून आर्थिक उन्नतीही साधली आहे. विशेष म्हणजे पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना याद्वारे आर्थिक उन्नतीचा सुलभ मार्ग दाखविला आहे.

Three brothers discovered the path to prosperity through agriculture | तीन भावडांनी शोधला शेतीतून उन्नतीचा मार्ग

तीन भावडांनी शोधला शेतीतून उन्नतीचा मार्ग

googlenewsNext
ठळक मुद्देपालांदुरच्या नंदनवार बंधूंचे परिश्रम : स्वप्नीलने फुलविली तीन एकरात बागायती शेती

लोकमत न्यूज नेटवर्क
खराशी : जिद्द व नावीन्याची आवड असेल तर प्रयत्नांना नक्कीच यश लाभते. त्यातही शेतक्षेत्रातील आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास कमी खर्चात चांगले पीक उत्पादन मिळते. पारंपरिक आणि अति खर्चिक पिकाला फाटा देऊन नवनवीन पिकांची लागवड केल्यावर देखील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळू शकतो. याचे उत्तम उदाहरण जिल्ह्यातील पालांदूर गावातील प्रगतशील शेतकरी असलेल्या स्वप्निल , आशिष व अंकुश शंकरराव नंदनवार या तीन भावडांनी दाखवून दिले आहे.
योग्य नियोजन व स्व:कष्टाच्या भरवशावर स्वप्नीलने अवघ्या तीन एकरात बागायती शेती सोबत झेंडूच्या फुलांची आंतरपिक शेती फुलविली आहे. यातून विविध प्रकारचा भाजीपाला पिकवून आर्थिक उन्नतीही साधली आहे. विशेष म्हणजे पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना याद्वारे आर्थिक उन्नतीचा सुलभ मार्ग दाखविला आहे. स्वप्निल व आशिष बंधू डि.एड. झाले असून अंकुश मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले असून नोकरीची आशा धूसर झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या वडीलोपार्जित शेतात सेंद्रीय शेतीला प्राधान्य देत बागायती शेतीसोबत झेंडू फुलांच्या आंतरपिक शेतीची संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आणली. बागायती शेतीतून निघणाºया हिरव्या भाजीपाल्याला परिसरातील नागरिकांची मागणी असल्याचे दिसून येत आहे. कारले , काकडी, लवकी, भेंडी, चवळी, वाल शेंगा, वांगी, भोपळा या पिकांना मोठी मागणीही मिळाली. आधुनिक शेतीतून आर्थिक उलाढाल कशी करता येईल, याचे उत्तम उदाहरण स्वप्निल-आशिष-अंकुश या भावंडानी दिले आहे. अल्प जागेतून उत्तम पीक उत्पादन कसे घेता येईल हे पटवून देण्यासाठी बागायती शेतीसोबत आंतरपिक शेतीचा संकल्प सोडला. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी थेट नागपूर येथे भाजीपाला योग्य दरात देणे सुरू आहे. मंडीपेक्षा भाव पण जास्त मिळतो आहे.

नोकरीची वाट पाहत बसण्यापेक्षा पारंपरिक शेत जमिनीत स्वत: राबवून पिकविलेल्या फळांची चव न्यारीच असते. तो आनंद अवर्णनीय आहे.
- स्वप्निल नंदनवार,
प्रगतशील शेतकरी
 

Web Title: Three brothers discovered the path to prosperity through agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती