शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींची नळयोजना तहानलेलीच

By admin | Updated: February 8, 2015 23:30 IST

राज्यात भाजपाची सत्ता असताना जीवन प्राधीकरण पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली होती. तालुक्यात पिंपळगाव/को. येथे कोट्यावधीचा निधी खर्च करुन ९ गावांसाठी

लाखांदूर : राज्यात भाजपाची सत्ता असताना जीवन प्राधीकरण पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली होती. तालुक्यात पिंपळगाव/को. येथे कोट्यावधीचा निधी खर्च करुन ९ गावांसाठी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. मात्र निधी खर्च होऊनही पाणीपुरवठा सुरु होऊ शकला नाही. कोट्यवधीची नळयोजना तहानलेली आहे.स्वच्छ व निरोगी पाणी समाजातील प्रत्येक नागरिकांच्या पिण्यासाठी जिवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली. तालुक्यात यासाठी दिघोरी/मोठी व पिंपळगांव/को. या गांवाची निवड करण्यात आली. यासाठी शासनाने कोट्यावधींचा निधी मंजूर केला. दिघोरी येथील नळयोजना पूर्णत्वास येवून लोकांच्या सेवेस उतरली. मात्र, पिंपळगांव/को. येथील भव्य दिव्य नळयोजना निधी खर्च होवूनही कोरडीच आहे. ही नळयोजना बांधकामाला सुरुवात होतानाच अनेक अडथळे आले. वारंवार कंत्राटदार बदलले अभियंत्यांना बांधकामाकडे पाठ फिरवली. त्यामुळे एकूणच बांधकामाला अडथळा आला. मात्र कंत्राटदाराची देयके रखडली नाही. निधी खर्च झाला मात्र, तालूक्यातील ९ गावांना पाणी पुरवठा होवू शकला नाही.लाखांदूर, मेडघाट, पिंपळगांव, मेंढा, चप्राड, दहेगांव, किन्हाळा, कन्हाळगांव, पूयार या ९ गावांना या योजनेअंतर्गत पाणी पुरवठा होणार होता. मधल्या १० वर्षापासून या ९ ही गावांना स्वतंत्र नळ योजना मंजूर करवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामीण पाणी पूरवठा योजनेतून करण्यात आल्याने ही जीवन प्राधिकरण योजना रखडली. मात्र निधीची वाट लागली.लाखांदूर/पालांदूर या गावाला मात्र कोणत्याच नळयोजनेचे पाणी अद्याप पोहोचले नाही. जिवन प्रादेशिक योजनेंतर्गत जलकुंभ प्लॉट येथे तयार आहे मात्र पाणी अद्याप पोहोचले नाही. या संदर्भात गावकऱ्यांना मुख्य कार्यपालन अधिकारी, खासदार नाना पटोले यांचेकडे तक्रारी करुन पिण्याच्या पाण्याच्या मागोवा धरुन ही नळयोजना सुरु करण्याची मागणी केली. मात्र प्लॉट येथील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होवू शकले नाही. (तालुका प्रतिनिधी)