शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे एक हजार बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी २७ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर तब्बल तीन महिन्याने १२ जुलै रोजी कोरोनाच्या पहिल्या मृत्यूची नोंद भंडारा तालुक्यात घेण्यात आली. त्यानंतरही मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते. सिंगल डिजिटमध्येच मृत्यूची नोंद होत होती. परंतु कोरोनाची दुसरी लाट आली आणि मृत्यूचे तांडव सुरू झाले. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार जणांचा बळी गेला आहे.

ठळक मुद्देदुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू : बाधितांची संख्या ५६ हजार ६८७

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत एक हजार बळी घेतले असून, सर्वाधिक मृत्यू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झाले आहेत. एकट्या एप्रिल महिन्यात ४८९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या तांडवाने एप्रिल महिन्यात प्रत्येक जण भयभीत झाला होता. गिरोला येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली होती. गत आठवडाभरापासून मृत्यूची संख्या घटली असल्याने दिलासा मिळत आहे.भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी २७ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर तब्बल तीन महिन्याने १२ जुलै रोजी कोरोनाच्या पहिल्या मृत्यूची नोंद भंडारा तालुक्यात घेण्यात आली. त्यानंतरही मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते. सिंगल डिजिटमध्येच मृत्यूची नोंद होत होती. परंतु कोरोनाची दुसरी लाट आली आणि मृत्यूचे तांडव सुरू झाले. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार जणांचा बळी गेला आहे. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात ३४३ मृत्यूची नोंद होती. मात्र एप्रिल महिन्यात ४८९ जणांचा कोरोनाने बळी घेतला. मे महिन्याच्या १२ दिवसात तब्बल १३३ जणांचा बळी गेला. मृत्यूच्या या तांडवाने सर्वत्र हाहाकार उडाला होता. दुसरीकडे रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनही मिळत नव्हता. अशा विपरीत परिस्थितीत सर्वसामान्य भयभीत झाले होते. जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात झाले आहेत. आतापर्यंत ४७३ जणांचा मृत्यू झाला. त्या खालोखाल तुमसर तालुक्यात १०७, पवनी १००, साकोली ९६, मोहाडी ९१, लाखनी ८६ आणि लाखांदूर तालुक्यात ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृत्युदर कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

बुधवारी ६०४ कोरोनामुक्त, ३०९ पाॅझिटिव्ह- जिल्ह्यात बुधवारी ३०९ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यात भंडारा तालुका ९७, मोहाडी ३४, तुमसर २५, पवनी २१, लाखनी ६२, साकोली ५७, लाखांदूर १३ रुग्णांचा समावेश आहे तर ६०४ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार ६८७ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी ५१ हजार ८१ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात ४६०६ रुग्ण उपचाराखाली आहेत.

११ जणांचा मृत्यू- जिल्ह्यात बुधवारी ११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात भंडारा ५, लाखांदूर ३, तर मोहाडी, पवनी आणि साकोली तालुक्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आता मृतांची संख्या एक हजार झाली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू