तरुणांना रोजगार देण्यासाठी शासकीय पातळीवर चर्चा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 06:00 AM2019-12-12T06:00:00+5:302019-12-12T06:00:31+5:30

जनतेचा विश्वास सार्थक ठरविणे माझे कर्तव्य आहे. माझ्याकडून माझ्या क्षेत्रातील जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांना सवलती मिळवून देणे व धान व इतर पिकांना योग्य भाव मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणार तसेच तरुणांना रोजगार देण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागामार्फत चर्चा करणार असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

They will discuss at the government level to provide employment to the youth | तरुणांना रोजगार देण्यासाठी शासकीय पातळीवर चर्चा करणार

तरुणांना रोजगार देण्यासाठी शासकीय पातळीवर चर्चा करणार

Next
ठळक मुद्देनाना पटोले : सानगडी येथे सत्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
सानगडी : जनतेचा विश्वास सार्थक ठरविणे माझे कर्तव्य आहे. माझ्याकडून माझ्या क्षेत्रातील जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांना सवलती मिळवून देणे व धान व इतर पिकांना योग्य भाव मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणार तसेच तरुणांना रोजगार देण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागामार्फत चर्चा करणार असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
तालुका काँग्रेस कमेटी व विविध सामाजिक संघटनातर्फे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्ह्यातील प्रथम आगमनाप्रित्यर्थ सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सत्कार सोहळ्याला माजी सभापती मधुकरराव लिचडे, जि.प. सदस्य होमराज कापगते, जि.प. सदस्य रेखाताई वासनिक, पं.स. सदस्य डोंगरवार, अशोक लिचडे, सचिन लिचडे, राकेश लिचडे, नयनाताई लिचडे, माजी पं.स. सदस्या सुनिता खंडाते, घनश्याम हर्षे, सुनील फुंडे, नीळकंठ नंदनवार, चुन्नीलाल वासनिक, गिरीधर रोकडे, नरेश बेलेकर, भूषण लिचडे, बाळकृष्ण हटनागर यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: They will discuss at the government level to provide employment to the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.