शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

लाखनीत नऊ लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

१४ मार्चच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. सोन्याची चेन, ३० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, सोन्याच्या बिऱ्या, म्हणी, खळे, अंगठी यासह चांदीच्या तोरड्या व स्टिल डब्यात ठेवलेले दहा हजार रुपयांची रोकडही चोरुन नेली.

ठळक मुद्देरोकडही लंपास : पोस्टऑफीस परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : शहरातील पोस्ट ऑफीस परिसरात राहणाऱ्या आशीष राजाभोज यांच्या घरी चोरट्यांनी हात साफ करीत नऊ लक्ष ४२ हजार रुपयांचा सोनेचांदीचा ऐवज व एक लाखांची रोकड चोरुन नेली. ही घटना शनिवारला उघडकीस आली. या घटनेने पुन्हा एकदा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.माहीतीनुसार, आशिष राजाभोज व त्यांचे पूर्ण कुटूंब गोंदिया जिल्ह्यातील दासगाव येथे नातलगाच्या अंत्यसंस्कार विधीसाठी गेले होते. घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरांनी घरात प्रवेश केला. विशेष म्हणजे राजाभोज कुटुंबीय बाहेर गेल्याने त्यांची मुलगी त्यांच्या भावाकडे राहायला गेली होती. १४ मार्चच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. सोन्याची चेन, ३० ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, सोन्याच्या बिऱ्या, म्हणी, खळे, अंगठी यासह चांदीच्या तोरड्या व स्टिल डब्यात ठेवलेले दहा हजार रुपयांची रोकडही चोरुन नेली.दुसºया रुममध्ये असलेले सोन्याचे साहित्यही चोरुन नेले. तसेच रोकड ११ हजार रुपये लंपास केले. असा सर्व मिळून ३१६ ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीचा ऐवज चोरुन नेला. चोरट्यांनी घराच्या समोरील दाराची कोंडी तथा सेंट्रल लॉक तोडून प्रवेश केला होता.घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम काटे, लाखनीचे पोलीस निरीक्षक डामदेव मंडलवार, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र म्हैसकर यांनी भेट दिली. घटनास्थळाहून फॉरेन्सीक लॅबच्या चमूने नमुणे तथा हातांचे ठसे गोळा केले आहेत.लाखनी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द भादंविच्या ४५७, ३८० कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रवींद्र म्हैसकर करीत आहेत.घटनांमध्ये वाढशहरासह ग्रामीण भागामध्ये चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. चोरांचा सुगावा लागत नसल्याने चोरांचे धाडस वाढले आहे. पोलीस तपास करीत असून सुगावा लागत नाही. अशावेळी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Thiefचोर