शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील रेती घाट लिलाव प्रक्रियेला झाली सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

 महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असणाऱ्या नद्याचे पात्रात मध्यप्रदेशातील रेती माफियांची घुसखोरी सुरू झाली असल्याने नद्याचे पात्र पोखरले जात आहे. नद्यांच्या पात्रात रेतीऐवजी मातीच दिसून येत आहे. जिल्ह्यात घाट लिलाव नसताना रेतीचे बेधडक ट्रक धावत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील ५४ रेती घाट लिलाव प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/ चुल्हाड : भंडारा जिल्ह्यातील ५४ रेती घाटाचे लिलाव प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरुवात केली आहे. ई निविदा ई लिलाव प्रक्रिया अंतर्गत घाटाचे लिलाव होणार आहे. तुमसर तालुक्यातील सर्वाधिक ११ घाटांचा यात समावेश असून बावणथडी नदीपात्रातील रेती मध्यप्रदेशातील रेती माफियानी पोखरल्याने पात्रात रेतीऐवजी आता मातीच शिल्लक आहे. माफियानी लिलावात असणाऱ्या वरपिंडकेपार गावांच्या हद्दीतून रेतीचा उपसा केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत असणाऱ्या नद्याचे पात्रात मध्यप्रदेशातील रेती माफियांची घुसखोरी सुरू झाली असल्याने नद्याचे पात्र पोखरले जात आहे. नद्यांच्या पात्रात रेतीऐवजी मातीच दिसून येत आहे. जिल्ह्यात घाट लिलाव नसताना रेतीचे बेधडक ट्रक धावत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील ५४ रेती घाट लिलाव प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. रेती घाट लिलाव प्रक्रिया ९ फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे. २३ फेब्रुवारीला ई लिलाव पद्धतीने घाट लिलावात काढण्यात येणार आहेत. भंडारा तालुक्यातील वडेगाव रिठी, मांडवी, कोथुर्णा, जुनी टाकळी, पवनी तालुक्यातील  वलनी, शिवनाळा, पवनी, गुडेगाव, जुनेना, येनोळा, तुमसर तालुक्यातील चारगाव, बाह्मनी, सुकळी दे, ढोरवाडा, तामसवाडी, पांजरा रे, मांडवी,  वरपिंडकेपार, सोंड्या, चांदमारा, मोहाडी तालुक्यातील पांजरा, पाचगाव, पाचगाव, टाकली, रोहा, बेटाळा, नीलज, ढिवरवाडा, मुंढरी, खमारी साकोली तालुक्यातील गिरोला, महालगाव, सालेबर्डी, ओटेकर, खंडाळा, परसोडी लाखनी तालुक्यातील पळसगाव, मिरेगाव, भूगाव, विहीरगाव, नरव्हा,  लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी, आसोला, लाखांदूर,  मोहरणा, गवराळा, आंतरगाव, विहिरीगाव, भागडी, खैरणा अशा गावातील घाटाचा यात समावेश करण्यात आलेला आहे. 

माती लिलावात   काढणार काय? - तुमसर तालुक्यातील यात सर्वाधिक ११ घाटांचा समावेश असून बावणथडी नदीच्या काठावरील वरपिंडकेपार आणि सोंड्या गावे आहेत. या दोन्ही घाटांची रेती मध्यप्रदेशातील रेती माफियांनी पोखरले आहे. घाट लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली असतानासुद्धा रेतीचा उपसा सुरूच आहे. मध्यप्रदेशातील रॉयल्टीच्या आधारावर विदर्भातील जिल्ह्यात रेतीची विक्री करीत आहेत. वरपिंडकेपार गावांच्या हद्दीत रेतीचा तुटवडा असल्याने जिल्हा प्रशासन आता माती लिलावात काढणार काय? असा सवाल आहे.