विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:01:05+5:30

अनुदानास पात्र असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्यावतीने एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन भंडारा येथे करण्यात आले. यावेळी संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.

Teachers' hunger strike for various demands | विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन

विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन

Next
ठळक मुद्देशिक्षक परिषदेचे निवेदन : शिक्षकांसह कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अनुदानास पात्र असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्यावतीने एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन भंडारा येथे करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले. राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसह संगणक शिक्षक निर्देशकांना सेवेत पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली.
रात्र शाळांना पूर्णवेळ शाळेचा दर्जा देवून शिक्षकांसह कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करून शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक वैद्य, कार्यवाह अंगेश बेहलपाडे, के.डी. बोपचे, अशोक रंगारी, पी.एम. नाकाडे, राधेश्याम धोटे, अविनाश पाठक, सुभाष गरपडे, प्रवीण दराडे, एस. कुथे, पी.पी. डोमळे, प्रदीप गोमासे, यादवराव गायकवाड, हरीभाऊ पडोळे, राजेश निंबार्ते, राजू बारई, दिलीप वाणी, महादेव तेलमासरे, राजेंद्र कडव, पांडूरंग टेंभरे, गुणवंत क्षीरसागर, गणेश सार्वे, आर.एस. पागोडे, मनिष काशिवार, दिशा गद्रे उपस्थित होते.

अशा आहेत शिक्षकांच्या मागण्या
अनुदानास पात्र प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वर्ग तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना १ एप्रिल २०१९ पासूनचे २० टक्के वाढीव अनुदान देवून वर्गतुकड्यांचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढावे, टीईटी अपात्र शिक्षकांचे जानेवारी २०२० पासूनचे रोखलेले वेतन न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिक राहून अदा करणे, सर्व समावेशक योजनेतील कर्मचाºयांना थकित व नियमित वेतन अदा करावे.

Web Title: Teachers' hunger strike for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक