शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचारी वेतनाविना

By admin | Updated: September 2, 2015 00:28 IST

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील अनुदानित ...

उपोषणाचा इशारा : तीन महिन्यांपासून वेतन नाहीभंडारा : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मागील तीन महिन्यांपासून वेतनाविना आहेत. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वेतनासह अन्य मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा ५ सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा अनुदानित आदिवासी आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने दिला आहे.या आशयाचे निवेदन वरिष्ठ विभागाला देण्यात आले आहे. आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या आदेशांतर्गत आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते थांबविल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभटर टक्के असल्याशिवाय कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येवू नये, असे आदेशात नमूद करण्यात आले. परिणामी जून, जुलै व आॅगस्ट २०१५ चे वेतन मिळालेले नाही. तसेच कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत वेतन देणे, डीडीओचे अधिकार मुख्याध्यापकांना देणे, दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घेणे, पहारेकरी पदाला मान्यता देवून मानधन देणे, निष्काळजीपणा करणाऱ्या प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणे, दरमहा १ तारखेला वेतन अदा करणे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वरिष्ठश्रेणी लागू करणे, शासकीय आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुदानित आदिवासी शाळेतील कर्मचाऱ्यांना सहायक प्रकल्प अधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी या पदावर बढती देणे, कर्मचाऱ्यांना सेवाशर्तीला संरक्षण प्रदान करणे, थकित वेतनबिल- अर्जित रजा व आरोग्यदेयक मंजूर करणे, भविष्य निर्वाह निधी हिशोब विवरणपत्र दोन वर्षांपासून देण्यात आले नाही ते देण्यात यावे, वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण सेवक बाबत मान्यता प्रस्तावात मंजुरी प्रदान करावी यासह एकूण ४२ मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आले आहे. या आशयाचे निवेदन २१ आॅगस्टला देवरी येथील प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मात्र मागण्यांच्या पूर्ततेवर कानाडोळा करण्यात येत आहे. परिणामी अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने दि. ५ सप्टेंबरपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्याच दिवशी प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.या आंदोलनात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जवळपास ५०० कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे. भंडारा जिल्ह्यात आठ तर गोंदिया जिल्ह्यात २४ अनुदानित आदिवासी आश्रम शाळा आहेत. मागण्यांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणीही संघटनेने केली आहे.(प्रतिनिधी)