शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाने केले महिलेचे 'शीलहरण'

By admin | Updated: September 29, 2014 00:37 IST

प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेला विविधांगी प्रलोभने दिली. यात आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका देऊन महिलेचे सर्वस्व लुटणाऱ्या शिक्षकाने 'तो मी नव्हेच'ची भूमिका घेतली. यामुळे पीडितेने

भंडारा : प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेला विविधांगी प्रलोभने दिली. यात आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका देऊन महिलेचे सर्वस्व लुटणाऱ्या शिक्षकाने 'तो मी नव्हेच'ची भूमिका घेतली. यामुळे पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली. यावरून 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील शाळेत सहायक शिक्षक असलेल्या दिनेश विनायक मोटघरे (२७) याचे विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडितेने अड्याळ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून, दिनेशने पीडित महिलेला २०११ मध्ये प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला आयुष्यभर जीवन जगण्याचे वचन दिले. यामुळे पीडित व दिनेश यांचे प्रेमसंबंध दृढ झाले. यात लग्नाचे आमिष दाखवून दिनेशने वेळोवेळी पीडितेवर तिच्या इच्छेविरूध्द २०१४ पर्यंत लैंगिक अत्याचार केला. यानंतर दिनेशने 'तो मी नव्हेच'ची भूमिका घेतल्याने पीडितेने त्याचा पिच्छा सोडला नाही. यात दोघांमध्ये खटके उडू लागल्याने दिनेशने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची तक्रार पीडित महिलेने अड्याळ पोलीस ठाण्यात दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिनेशविरुध्द कलम ३७६ (२) (फ), ५०६ भादंवि अन्वये गुन्हे नोंदविले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहे. विद्यार्जनाचे पवित्र कार्य करून भावी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकाने असे कृत्य केल्याने अड्याळ परिसरात सध्या चर्चेला उधाण आले आहे. (शहर प्रतिनिधी)