शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायकारी सरकारला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST

विविध मागण्यांना घेऊन भारतीय जनता पक्षाच्यावतीने साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक माेर्चा काढण्यात आला. यावेळी त्रिमूर्ती चाैकात झालेल्या सभेत फडणवीस ...

विविध मागण्यांना घेऊन भारतीय जनता पक्षाच्यावतीने साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक माेर्चा काढण्यात आला. यावेळी त्रिमूर्ती चाैकात झालेल्या सभेत फडणवीस बाेलत हाेते. यावेळी मंचावर माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, आमदार डाॅ. परिणय फुके, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार चरण वाघमारे, बाळा काशिवार, ॲड. रामचंद्र अवसरे, संजय पुराम, माे. तारीक कुरेशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, प्रदीप पडाेळे, श्याम झिंगरे, उपेंद्र काेठेकर, मुकेश थानथराटे, संजय कुंभलकर, आशु गाेंडाणे, रुबी चढ्ढा, दिनेश भुरे आदी उपस्थित हाेते.

फडणवीस म्हणाले, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे दाेन वर्षांपासून थकीत चुकारे मिळाले नाही. धान खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचार हाेत असून त्याला विद्यमान शासन खतपाणी घालत आहे. काेराेना काळातील शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचे सूताेवाच करणारे शासन आपल्याच शब्दातून माघारी फिरले आहेत. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कुठल्याही कर्जमाफीचा व प्राेत्साहन निधीचा लाभ मिळाला नाही. घरकूल याेजनेचा बाेजवारा उडाला असून अशा अन्यायकारक शासनाला जाब विचारण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी असून दाेषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

याप्रसंगी खासदार सुनील मेंढे म्हणाले, राज्यसरकार अनेक बाबतीत सपेशल फेल ठरले आहे. शेतकरी, शेतमजूर, दूध उत्पादक अडचणीत सापडले आहे. अशावेळी मदतीचा हात देण्यापेक्षा वीजपुरवठा खंडित करण्याचा अफलातून आदेश काढणाऱ्या शासनाला जनसामान्यांची फिकीर नाही असेच वाटते. याप्रसंगी माजी आमदार चरण वाघमारे, शिशुपाल पटले यांच्यासह अन्य मंडळीनी मार्गदर्शन केले. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी संदीप कदम यांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाचे नेतृत्व आमदार परिणय फुके यांच्यासह खासदार सुनील मेंढे, शिशुपाल पटले, चरण वाघमारे, बाळा काशिवार, तारीक कुरैशी, मुकेश थानथराटे, प्रदीप पडाेळे, संजय कुंभलकर आदी उपस्थित हाेते.

बाॅक्स

गरिबांचे हाल बेहाल - परिणय फुके

राज्यातील आघाडी सरकारने शेतमजूर, शेतकरी व जनसामान्यांना अनेक बाबतीत वेठीस धरण्याचा विडा उचलल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्या धानाचे चुकारे अजूनही मिळाले नाही. घरकूल लाभार्थ्यांना लाभ मिळत नसून आवास याेजनेचा लाभासाठी ते तरसत आहेत. याशिवाय काेराेना काळातील वीज बिल माफी, पूरग्रस्तांना मदत, घरकूल याेजनेचा लाभ मिळाला नाही, असे आमदार डाॅ. परिणय फुके यांनी सांगितले.