शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सिहोरा परिसरात तापाची साथ

By admin | Updated: September 8, 2014 00:45 IST

दोन नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या सिहोरा परिसरात तापाची साथ पसरली आहे. शासकीय रुग्णालय तथा खासगी दवाखाने रुग्णांच्या संख्येने हाऊसफुल होत आहेत.

चुल्हाड (सिहोरा) : दोन नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या सिहोरा परिसरात तापाची साथ पसरली आहे. शासकीय रुग्णालय तथा खासगी दवाखाने रुग्णांच्या संख्येने हाऊसफुल होत आहेत. यात बपेरा गावात डेंग्यू या आजाराचे ३ रुग्ण आढळल्याने परिसरात भिती निर्माण झाली आहे.सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी नद्या आहेत. या नद्यांचे पुराचे पाणी शेतशिवार आणि गावात शिरत आहे. पुराचे पाणी ओसरताच अनेक आजारांचा गावात प्रसार होत आहे. परिसरात नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी शासकीय रुग्णालय तथा खासगी दवाखाने आहेत. सिहोऱ्यात ग्रामीण रुग्णालय, चुल्हाडात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बपेरा गावात आंग्ल दवाखाना कार्यरत आहे. गावागावात उपकेंद्र आहेत. आरोग्य सेवेत सक्षम असणारा परिसर आज घडीला रिक्त पदामुळे वांझोटा ठरत आहे. चुल्हाडच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत नाही. या केंद्रा अंतर्गत बपेरा, चुल्हाड, परसवाडा, वाहनी, हरदोली, मोहाडी (खापा) सिहोरा आणि टेमणी गावात उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रात आरोग्य सेवकांची पदे रिक्त आहेत. उपकेंद्रात परिचारिका नाहीत. (वार्ताहर)तुमसरात डेंग्यूची धास्तीतुमसर : तालुक्यात मागील एका महिन्यापासून डेंग्यूसदृष्य आजाराने थैमान घातले आहे .शासकीय उपाययोजना याकरिता कमी पडली असून प्रत्येक घरात किमान एक रुग्ण तापाने आजारी आहे. रोगाबद्दल भीती तथा डेंग्यू या आजारावर सर्वसामान्य नागरिकात जनजागृतीकरिता सोमवारी दुपारी ३ वाजता एकदिवसीय कार्यशाळा पं.स. कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विषयक तज्ज्ञ उपस्थित राहणार असून या कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डोईफोडे, खंडविकास अधिकारी स्नेहा कुळथे, पं.स. सभापती कलाम शेख मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत डेंग्यू आजार त्याची कारणे, लक्षणे, उपाय यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तुमसर तालुक्यातील अनेक गावात डेंग्यूसदृष्य आजाराची लागण अनेकांना झाली आहे. शासकीयस्तरावर उपाययोजना कमी पडल्याने अनेकांनी खासगी दवाखान्यातून उपचार करणे सुरु आहे. डेंग्यू आहे किंवा नाही एकवाक्यता नाही. शासकीय वैद्यकीय अधिकारी डेंग्यू हा आजार नसल्याचे सांगतात. पुणे व नागपूर येथील प्रयोगशाळेतून रक्ताचे नमूने पॉझीटीव्ह आले तरच डेंग्यू आहे. अन्यथा तो ताप डेंग्यूचा नाही. त्यामुळे नेमका कोणता आजार आहे याबाबत तालुक्यात संभ्रवस्था आहे. (तालुका प्रतिनिधी)