शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

तमाशा समाजप्रबोधनाचे माध्यम

By admin | Updated: November 1, 2014 22:49 IST

पूर्वीच्या काळापासून महाराष्ट्रात तमाशांनी समाज प्रबोधनाची कार्य केलीत. विविध वाईट चालिरीती, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, बुवाबाजी यांच्यावर कडाडून टीका केली. मात्र कालौघात तमाशाकडे समाजाचा

करडी (पालोरा) : पूर्वीच्या काळापासून महाराष्ट्रात तमाशांनी समाज प्रबोधनाची कार्य केलीत. विविध वाईट चालिरीती, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, बुवाबाजी यांच्यावर कडाडून टीका केली. मात्र कालौघात तमाशाकडे समाजाचा पाहण्याचा कल बदलला आहे. पालोर येथील हौशी तरुणांनी तमाशाचे आयोजन करून पुन्हा या कलेला वाढविण्याचे काम केले आहे. अतिशय अभिमानाची बाब आहे. विविध मंडळांनी यातून प्रेरणा घेऊन कला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन काशिनाथ ढोमणे यांनी केले. पालोरा येथे पळसटोली व सिव्हील लाईन यांचे सौजन्याने मंडईनिमित्त आयोजित तमाशाच्या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पालोरा येथे २० वर्षानंतर राष्ट्रीय संगीत खडा तमाशाचे आयोजन पार पडले. सुरुवातीपासूनच रसिकांमध्ये तमाशा पाहण्याची हुरहूर लागली होती. जांभोरा येथील शाहीर अरुण ऊर्फ अरविंद बंसोड यांचे नाव जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात गाजत असताना त्यांचे कार्यक्रम परिसरातील मोठ्या गावात झालेले नव्हते. त्यामुळे सहाजिकच गावकऱ्यांच्या मनात उत्सुकता होती. ती पूर्ण झाली. मंडईच्या निमित्ताने. तमाशाचा फड सुरु होताच प्रेक्षकांची अलोट गर्दी जमा झाली. वृध्द, तरुण, प्रतिष्ठित नागरिकांबरोबर महिला व तरुणांनी हजेरी लावली. गर्दी सांभाळताना आयोजकांना कठीणाईचा सामना करावा लागत होता. तमाशातील नर्तकी असलेले तरुण गोरगोमटे व हुबेहुब तरुणीसारखे दिसत असल्याने अनेक तरुणांना मोबाईल, कॅमेरामध्ये त्यांचा फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही. तमाशा कार्यक्रमाचे उद्घाटकस्थानी केसलवाडा जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक घनश्याम समरीत तर अध्यक्षस्थानी काशिनाथ ढोमणे होते. अतिथी म्हणून सरपंच माला मेश्राम, उपसरपंच गणेश कुकडे, माजी उपसरपंच महादेव बुरडे, रोजगार सेवक बळीराम अतकरी, भैय्या कनोजकर, हनुमान देवस्थान कमेटी सचिव विश्वनाथ हाडगे, दुर्योधन मरमडे, पोलीस पाटील वीरेंद्र रंगारी, उमेश भोयर, ग्रा.पं. सदस्य सुनिल पेंदाम, भोजराम तिजारे, धनराज तिजारे, दुर्गादास वनवे, हितेश बुरडे, देवदास गहाणे, निलज बुजचे सरपंच महादेव पचघरे, सहाय्यक फौजदार अश्विन मेहर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मनोहर रोटके, संदिप खोब्रागडे, विजय मेश्राम, कैलाश मेश्राम, बावणे, कलगी पार्टीचे शाहीर अरविंद ऊर्फ अरुण बंसोड, शाहीर राजहंस आणि संपूर्ण चमू प्रामुख्याने हजर होते. कार्यक्रमासाठी मंडळाचे रवी कुकडे, युवराज गोमासे, उमेश तुमसरे, रमेश ठवकर, लवकुश कुकडे, शाम काळे, महाराज तिजारे, मनोहर तिजारे, भोयर यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)