शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके कमीत-कमी विषारी असतात. शेतकºयांनी तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशक फवारणीसाठी वापरू नये. फवारणी करताना मोजे, पायमोजे, चष्मा व सेफ्टी किट वापरावी. चेहरा नीट बांधून हवेच्या प्रवाहाच्या दिशेचा आधी अंदाज घेत प्रवाह मंद असतानाच फवारणी करावी. फवारणीनंतर स्वच्छ आंघोळ करुन वापरलेले कपडे धुऊन टाकावेत. वापरलेले स्प्रे, टाकी, बकेट स्वच्छ धुवावे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन : शेतकऱ्यांनी सावधानता बाळगण्याची गरज, वेळीच तुडतुड्याचे व्यवस्थापन करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानपिकावरील $कीडींचा नायनाट करण्यासाठी शेतकरी कीटकनाशक फवारणी करीत आहेत. शेतकऱ्यांनी फवारणी करताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.फवारणी करताना सुरक्षित कीटचा वापर करावा. शेतकऱ्यांनी अंगावर कीटकनाशक उडणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशकावरील लेबल व माहिती पूर्णपणे वाचून सूचनांचे पालन करावे. डब्यावरील लाल रंगाचे पतंगीचा आकाराचे चिन्ह असलेली कीटकनाशके सर्वात विषारी त्यानंतर पिवळा, निळा, हिरवा असा क्रम लागतो.हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके कमीत-कमी विषारी असतात. शेतकऱ्यांनी तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशक फवारणीसाठी वापरू नये. फवारणी करताना मोजे, पायमोजे, चष्मा व सेफ्टी किट वापरावी. चेहरा नीट बांधून हवेच्या प्रवाहाच्या दिशेचा आधी अंदाज घेत प्रवाह मंद असतानाच फवारणी करावी. फवारणीनंतर स्वच्छ आंघोळ करुन वापरलेले कपडे धुऊन टाकावेत. वापरलेले स्प्रे, टाकी, बकेट स्वच्छ धुवावे.फवारणी केलेल्या शेतात मनुष्य अथवा जनावरांस चरण्यास प्रवेश करू देऊ नये. कीटकनाशकांचे डबे पुन्हा न वापरता ते खोल खड्ड्यात पुरून टाकावे. तंबाखू, खर्रा खाण्याचे शक्यतो टाळावे. अशा प्रकारची काळजी घेतल्यास कोणताही धोका न होता फवारणी परिणामकारक होईल असे कृषी विभागाने सांगितले आहे.बाधित व्यक्तीची घ्यावयाची काळजीएखादी व्यक्ती फवारणी करत असताना बाधित झाल्यास अथवा कीटकनाशक पोटात गेल्यास त्वचा,डोळे, श्वसनेेंंद्रियाद्वारे विषबाधा होऊ शकते.व्यक्तीस विषबाधा झाल्यास त्वरीत अपघात स्थळापासून दूर नेऊन त्याच्या अंगावरचे कपडे त्वरित बदलावे. बाधीत व्यक्तीचे अंग, अवयव साबणाने स्वच्छ धुवावेत. कोरड्या टॉवेलने पुसावे कीटकनाशक पोटात गेल्यास ताबडतोब ओकारी करण्यास सांगावी. जास्त घाम येत असल्यास कोरड्या टॉवेलने पुसावे, थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरून द्यावे. श्वासोश्वास योग्य रीतीने सुरू आहे का याची तपासणी करावी. कीटकनाशक माहिती पत्रिकेप्रमाणे अँटी बायोटिक घ्यावे. रोगी बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करावे. काहीही खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नये बाधित व्यक्तीस त्वरित कीटकनाशकाच्या पत्रकासह डॉक्टरांना दाखवावे. प्राथमिक उपचार करुन त्वरीत दवाखाण्यात नेल्यास जीवीतहानी टळू शकते. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कर्मचाºयांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपविभागीय कार्यालय, भंडाराचे तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी