शासनाच्या योजनांचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2016 00:43 IST2016-09-23T00:43:28+5:302016-09-23T00:43:28+5:30

पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांसाठी वयक्तीक लाभाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत.

Take advantage of government schemes | शासनाच्या योजनांचा लाभ घ्या

शासनाच्या योजनांचा लाभ घ्या

एल.पी. देशमुख यांचे आवाहन : खुटसावरी येथे पशुचिकित्सा शिबिर
भंडारा : पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांसाठी वयक्तीक लाभाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. गोपालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनामार्फत विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनांचा पशुपालकांनी लाभ घेवून आपला आर्थिक दर्जा वाढवावा, असे आवाहन खुटसावरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एम.पी. देशमुख यांनी केले.
महाराजस्व अभियान अंतर्गत राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ खुटसावरी येथे पशुचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी गोपालकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.के. वाढई, सहायक पशुधन विकास अधिकारी पगारे, पशुधन पर्यवेक्षक दुर्गे, भडके, चामलाटे, पशुसंवर्धन विभाग साकोलीचे सहायक आयुक्त डॉ. वाय.एस. वंजारी, पशुधन विकास अधिकारी डॉ. वैद्य आदी उपस्थित होते.
यावेळी गोपालकांना पशुसेवा पुरविण्यात आली. एकूण २३० जनावरांची तपासणी करण्यात आली. यात ८० जंत निर्मूलन, ६० गोचिड निर्मूलन, २० वंधत्व तपासणी, २० गर्भतपासणी, दोन कृत्रिम रेतन, १० खच्चीकरण, ३८ जनावरांवर उपचार करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने माहितीपत्रक वितरीत करण्यात आले व पशुपालकांना माहिती देण्यात आली. आयोजित कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने स्टॉल लावण्यात आले. स्टॉलमध्ये कामधेनू दत्तक ग्राम योजनेचे माहितीपत्रक, अझोला शेवाळवर्गीय वनस्पतीचे जनावरांच्या आहारात महत्व, निकृष्ठ चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करून सकस आहारात रूपांतर करणे, विविध चारा पिके लागवड बरसीम, मका, ज्वारीची आहारात महत्व, गुढ उत्पादनात दशसुत्री, पशुधन विमा योजनेची माहिती देण्यात आली.
शिबिराचे प्रास्ताविक पशुधन विकास अधिकारी डॉ. एल.पी. देशमुख यांनी केले.
संचालन पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.के. वाढई तर आभार प्रदर्शन परिचर माणिक चौधरी यांनी केले. शिबिरासाठी पशुधन पर्यवेक्षक दुर्गे, भडगे, चामलाटे, माणिक चौधरी, भोयर, डडमल यांनी सहकार्य केले. शिबिराला मोठ्या प्रमाणात गोपालकांनी हजेरी लावली होती. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Take advantage of government schemes