शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ताडपत्री वाटपात घोळ !

By admin | Updated: June 14, 2015 01:50 IST

मागीलवर्षी सन २०१३-१४ या वर्षात लाखनी तालुक्यातील खराशी परिसरात चक्रीवादळामुळे घरावरचे छपरे उडाले होते.

अतकरी यांचा आरोप : सत्ताधारी म्हणतात, सर्वेक्षणानुसारच केले ताडपत्रीचे वाटप भंडारा : मागीलवर्षी सन २०१३-१४ या वर्षात लाखनी तालुक्यातील खराशी परिसरात चक्रीवादळामुळे घरावरचे छपरे उडाले होते. त्यावेळी लोकसभा निवडणुकीवर लक्ष ठेऊन जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाने बाधीत कुटूंबांना ताडपत्री देण्याची घोषणा केली. आता जिल्हा परिषद निवडणुकीवर लक्ष ठेऊन वर्षभरानंतर या ताडपत्रींचे वाटप करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य किरण अतकरी यांनी केला आहे.सत्ताधारी पक्षाने सर्वसाधारण सभेच्या पुरवणी बजेटमध्ये मंजुरी देऊन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्हा परिषदेने १.२० कोटी रूपयांची ताडपत्री खरेदी केली. या खरेदीविषयी सर्वसाधारण सभेत चर्चेच्या वर्षभरानंतर बाधित कुटूंबांनी ताडपत्रीची वाट न पाहता संसार कसाबसा मांडला. अपुऱ्या पावसामुळे शेती व धान पिकाला फटका बसल्यामुळे या शेतकऱ्यांना धान्य बियाणांची किट पुरवावी, अशी मागणी केली. परंतु, सत्ताधाऱ्यांनी ताडपत्री खरेदीचा निर्णय घेऊन कोणत्या विभागाने ताडपत्री खरेदी करायची व खरेदीचा अधिकार कुणाचा या कमिशनच्या वादात वर्ष घालविला. मागणी नोंदविताना नमुना म्हणून दाखविलेली ताडपत्री व पुरवठा करण्यात आलेली ताडपत्री यात तफावत आहे. यावरून ताडपत्री या निकृष्ट दर्जाच्या पुरविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या ताडपत्री खरेदीत जिल्हा परिषदेच्या लेखा समितीत कृषी विभागावर ५६ लाख रूपये भरण्याचे आदेश दिले आहे. या खरेदी प्रकरणात वर्षभरानंतर चुकीच्या प्रकारे खरेदी करण्यात आल्याचे सांगून कृषी अधिकारी व संबंधित पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची आमची मागणी आहे. अन्यथा न्यायालयातून दाद मागणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)शासनाच्या सर्वेनुसारच वाटप - खंडाईतगारपीटीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांप्रति सामाजिक बांधिलकीचे भान राखून जिल्हा परिषदेने या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सर्व्हेक्षण केले. त्यानुसार लाभार्थ्यांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. मदतीचे वाटप हे निष्पक्षपणे करण्यात आले. असे असताना आता जिल्हा परिषद निवडणूक लक्षात घेऊन विरोधकांनी असे आरोप करणे हे चुकीचे आणि जाणीवपूर्वक असल्याचे जि.प. सदस्य भरत खंडाईत यांनी म्हटले.