मॅग्निज खाणीत चिनी वायंडर यंत्राचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:01:05+5:30

भारत आणि चीनमध्ये सीमेवरून तणाव वाढला. अनेक मोबाईल अ‍ॅपला भारतात बंदी घालण्यात आली. व्यापार धोरणात आयात यंत्रावरही बंदी येण्याची शक्यता आहे. अशातच तुमसर तालुक्यातील मॅग्निज खाणीत वायंडर यंत्र इतिहासजमा होणार काय असा प्रश्न निर्माण झाला. जगात क्रमांक दोनची चिखला भूमिगत खाण आहे. भूगर्भातून मॅग्निज काढण्यासाठी सध्या आधुनिक यंत्राचा वापर येथे करण्यात येतो.

The sway of the Chinese winder machine in the manganese mine | मॅग्निज खाणीत चिनी वायंडर यंत्राचा बोलबाला

मॅग्निज खाणीत चिनी वायंडर यंत्राचा बोलबाला

Next
ठळक मुद्देसुटे भाग चीनमधून आयात : आत्मनिर्भर भारतच्या घोषणेनंतर चिनी यंत्रावर बंदीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आत्मनिर्भर भारतची घोषणा झाल्यानंतर चीन येथून आयात होणाऱ्या यंत्रांवर लगाम लागला आहे. परंतु तुमसर तालुक्यातील जगप्रसिद्ध भूमीगत चिखला खाणीत चीनच्या वायंडर यंत्राचा बोलबाला आहे. खाणीतून मॅग्निज काढण्याची मोठी भूमिका वायंडर यंत्र बजावत आहे. आता या यंत्रावरही बंदी येणार काय, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.
भारत आणि चीनमध्ये सीमेवरून तणाव वाढला. अनेक मोबाईल अ‍ॅपला भारतात बंदी घालण्यात आली. व्यापार धोरणात आयात यंत्रावरही बंदी येण्याची शक्यता आहे. अशातच तुमसर तालुक्यातील मॅग्निज खाणीत वायंडर यंत्र इतिहासजमा होणार काय असा प्रश्न निर्माण झाला. जगात क्रमांक दोनची चिखला भूमिगत खाण आहे. भूगर्भातून मॅग्निज काढण्यासाठी सध्या आधुनिक यंत्राचा वापर येथे करण्यात येतो. कमी वेळात जास्त मॅग्निजचे उत्खनन करण्यासाठी टार्गेट दिले जाते. त्यासाठी आधुनिक यंत्राचा पुरवठा केला जातो. सध्या चिखला भूमिगत खाणीत चीनची वायंडर यंत्र येथे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
सदर मशीनचे सुटे भाग आयात करण्यात येतात. भारतीय कंपनीसोबत सलग्न असणारी कंपनी वायंडर यंत्राची निर्मिती करते. चिनच्या वस्तूंवर निर्बंध आणल्यानंतर खाण मंत्रालयाने भारतीय कंपन्यांकडून सदर यंत्राचे सुटे भाग निर्मिती करण्याची चाचपणी सुरु केल्याची माहिती आहे. खाणीत चीनच्या यंत्राशिवाय पर्याय नाही.

असे काम करते वायंडर यंत्र

मॅग्निज खाणीमध्ये वायंडर यंत्र वर लावले असते. भूमिगत खाणीत कामगारांना ने आण आणि भूगर्भातील मॅग्निज वायंडर (केबल) त्या सहाय्याने ओढण्याचे काम यंत्र करते. चिखला खाणीत दोन वायंडर यंत्र आहेत. तीन ते चार वर्षापूर्वी सदर यंत्र येथे बसविण्यात आले होते.
कामगारांची संख्या कमीच

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मॅग्निज खाणीत कामगारांची उपस्थिती ७५ टक्के आहे. चिखला खाणीत एकुण १५०० कामगारांपैकी केवळ ९५० कामगार कर्तव्य बजावत आहेत. यात कंत्राटदार मजूरांचाही समावेश आहे. या मजुरांच्या भरवशावर आणि वायंडर मशीनने उत्खनन केले जाते.

चिखला भूमिगत खाणीत तीन वर्षापूर्वी वायंडर यंत्र आले. सुटे भाग चीनमधून आयात करून भारतातील कारखान्यात यंत्र बनविण्यात आले. खाण मंत्रालय याबाबत अंतिम निर्णय घेईल.
- राजेश भट्टाचार्य, खाण प्रतिनिधी, चिखला - डोंगरी खाण

Web Title: The sway of the Chinese winder machine in the manganese mine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन