शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ग्रामसेवकाला निलंबित करा

By admin | Updated: September 20, 2016 00:35 IST

पवनी तालुक्यातील मांगली येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत घडलेल्या प्रकारात ग्रामसेवक दत्ता जाधव यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे,..

सीईओंना निवेदन : मांगली ग्रामवासीयांची मागणीभंडारा : पवनी तालुक्यातील मांगली येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत घडलेल्या प्रकारात ग्रामसेवक दत्ता जाधव यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व मांगली ग्रामवासीयांनी केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देण्यात आले.मांगली येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा विषय घेण्यात आला होता. नियमाप्रमाणे सभेचे कोरम पूर्ण झाल्यावर ग्रामसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यांच्या परवानगीने सभेला सुरूवात करण्यात आली. सभेचे कोरम पूर्ण झाले असून ग्रामसेवकाने नकळत सभाध्यक्षांची सही घेवून सभा स्थगित दाखविली व सभेतून ग्रामसेवक जाधव निघून गेले. परंतु सभा अध्यक्षांच्या परवानगीने सभेचे कोरम पूर्ण झाल्यामुळे परत सभा ग्रामपंचायत कार्यालयात बोलाविली. त्यामध्ये गोवर्धन बावनकर यांनी सर्वानुमते निवड करण्यात आली.सभेची कारवाई पुर्ण झाल्यामुळे नवीन अध्यक्ष व ग्रामवासीयांचे आभार मानण्यात आले. सभा आटोपल्यानंतर प्रोसेडिंगची कॉपी ग्रामपंचायत सदस्यांना मिळाली. घडलेला प्रकार ग्रामसेवक दत्ता जाधव यांना निवडलेला अध्यक्ष त्यांच्या मर्जीतला नसल्यामुळे त्यांनी रात्री ११.३० वाजता पवनी पोलीस ठाण्यात जावून प्रतिष्ठीत नागरिकांविरूद्ध खोटी तक्रार केली. ग्रामसेवक संघटनेचे सचिव असल्यामुळे नेतेगीरीचा आव आणून गावकऱ्यांवर खोटे आरोप लावण्यात आले आहे, असा आरोपही निवेदनातून ग्रामस्थांनी केला आहे.यापूर्वीही त्यांनी गावकऱ्यांनावर खोटे आरोप लावून दबाव टाकण्याचा प्रयत्न केले असल्याचेही निवेदनात नमूद आहे. यासर्व प्रकारामध्ये एका ग्रामसेवकाचा खोट्या माहितीमुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे नाहकच जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये ग्रामसेवकांविरोधात असंतोष निर्माण झाला असून अशा ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास ग्रामवासी व ग्रामपंचायत सदस्य आंदोलन उभारतील, असा इशाराही देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)