शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षांच्या लढ्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

अशोक पारधी । लोकमत न्यूज नेटवर्क पवनी : शिक्षण, आरोग्य, व्यापार व पर्यटन या सर्व क्षेत्रातील आदानप्रदान व भरभराटीसाठी ...

ठळक मुद्देमैलाचा दगड। वैनगंगा नदीवर ईटाण-कोलारीदरम्यान पूल होणार

अशोक पारधी ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : शिक्षण, आरोग्य, व्यापार व पर्यटन या सर्व क्षेत्रातील आदानप्रदान व भरभराटीसाठी भंडारा व चंद्रपूर जिल्हा कमी अंतराने जोडण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील लोकांनी गेल्या ४० वषार्पासून सामुहिक लढा सुरु केलेला होता. वैनगंगा नदीवरील ईटान - कोलारी दरम्यान पुलाची प्रसिध्द झालेली निविदा पाहून लढ्याच्या शिलेदारांनी हर्षोल्लास व्यक्त केला.‘लोकमत’ ने ईटान - कोलारी दरम्यान पूल व्हावा,या वृत्ताला प्राधान्य दिले होते. हे विशेषत: भंडारा व चंद्रपूर जिल्हा मुख्यालयाचे अंतर पुलामुळे ५० कि. मी. ने कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांची पैसा व वेळेची बचत होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर तालुका मुख्यालयापासुन १५ कि. मी. तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी व नागभिड तालुका मुख्यालयापासुन तेवढ्याच अंतरावर पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. ईटान - कोलारी दरम्यान हल्ली सुरु असलेल्या धोकादायक डोंग्याचे प्रवासाला पुलामुळे विराम मिळणार आहे.शिक्षण, आरोग्य, व्यापार व पर्यटन या सर्व क्षेत्रातील आदानप्रदान होण्यासाठी पुल मैलाचा दगड ठरणार आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले नागझिरा अभयारण्य, नवेगाव बांध जलाशय, इटियाडोह प्रकल्प, उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्य, गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, शोधग्राम, आनंदवन, हेमलकसा हे सर्व कमी अंतराने जोडले जाणार आहे. पर्यटन वाढीसाठी ईटान - कोलारीदरम्यान होऊ घातलेला पुल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ईटान - कोलारी सेतू निर्माण समितीने हर्षोल्लास व्यक्त केला आहे.

टॅग्स :riverनदी