शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयातील दोन्ही रुग्णवाहिका ‘आजारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:02 IST

पुर्वविदर्भात आरोग्य सुविधेसाठी नावलौकीक असलेल्या तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील दोनही रुग्णवाहिका आता कालबाह्य झाल्यात जमा असून त्यांचीच सेवा घेतली जात असल्याने त्या सतत नादुरुस्त असतात. आता त्या दोन्ही रुग्णवाहिका नागपूर येथे दुरुस्तीसाठी पाठविल्याचे रुग्णांची हेळसांड होत आहे. सर्व भार १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकावंर आला आहे.

ठळक मुद्देतुमसरमध्ये रुग्णांची हेळसांड : दुरुस्तीसाठी नागपूरकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पुर्वविदर्भात आरोग्य सुविधेसाठी नावलौकीक असलेल्या तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील दोनही रुग्णवाहिका आता कालबाह्य झाल्यात जमा असून त्यांचीच सेवा घेतली जात असल्याने त्या सतत नादुरुस्त असतात. आता त्या दोन्ही रुग्णवाहिका नागपूर येथे दुरुस्तीसाठी पाठविल्याचे रुग्णांची हेळसांड होत आहे. सर्व भार १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकावंर आला आहे.तुमसर येथे सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय आहे. याठिकाणी १०० घाटांची सोय आहे. तुमसर तालुक्यासह मध्यप्रदेशातील रुग्ण येथे मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. आरोग्य सेवा पुरविल्याबदल आतापर्यंत या उपजिल्हा रुग्णालयाला अनेक पुरस्कार मिळाले आहे. अशा या नावलौकीक प्राप्त उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका मात्र सतत आजारी असते. विशेष म्हणजे गत अनेक वर्षांपासून सेवेत आहेत. त्या सतत नादुरुस्त होतात.पंधरा दिवसांपूर्वी दोन्ही रुग्णवाहिकेत तांत्रीक बिघाड झाल्या त्यामुळे दोन्ही रुग्णवाहिका नागपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आल्या आहेत. सर्व भार १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर आहे. रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडून रितसर परवानगी घ्यावे लागते. त्यामुळे यात बराच वेळ जावु शकतो. तोपर्यंत रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.रुग्णांचा आरोग्य सेवेतील रुग्णवाहिका अविभाज्य घटक आहे. रुग्णवाहिकेत वारंवार तांत्रीक बिघाड होत असल्याने रुग्णवाहिकेचे आयुष्य संपल्यातच जमा आहे. आता येथे नविन रुग्णवाहिका गरजेची झाली आहे. शासनाने अत्याधुनिक नविन रुग्णवाहिका द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक कमलाकर निखाडे यांनी केली आहे.तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दोन रुग्णवाहिका आहेत. त्या दुरुस्तीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आल्या आहेत. सध्या रुग्णांसाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या सेवा सुरु आहे. आवश्यक रुग्णांना तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली जाते.- डॉ. कल्पना म्हसकरअधीक्षक उपजिल्हा रुग्णालय तुमसर