शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा संप, खासगीचे तिकीट दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाने बस वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. भंडारा विभागातील कर्मचारी ३० ऑक्टाेबरपासून संपावर गेले; परंतु सुरुवातीच्या पाच दिवसांत फारसा परिणाम दिसत नव्हता. तुरळक बससेवा सुरू हाेती; परंतु ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून एस.टी.च्या भंडारा विभागातील सहाही आगारांचे जवळपास दीड हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यात चालक, वाहक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे गत पाच दिवसांपासून आगारातून एकही बस बाहेर पडली नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवाळीच्या पर्वात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उचलले आणि खासगी वाहतूकदारांची चांदी झाली. एस.टी.पेक्षा दुप्पट भाडे आकारून प्रवासी वाहतूक सुरू आहे. बसस्थानकाबाहेर ठिय्या मांडून प्रवाशांना अक्षरश: जनावरांप्रमाणे खासगी वाहनांत काेंबले जात आहे. नाइलाज असल्याने प्रवासीही गप्प आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाने बस वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. भंडारा विभागातील कर्मचारी ३० ऑक्टाेबरपासून संपावर गेले; परंतु सुरुवातीच्या पाच दिवसांत फारसा परिणाम दिसत नव्हता. तुरळक बससेवा सुरू हाेती; परंतु ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून एस.टी.च्या भंडारा विभागातील सहाही आगारांचे जवळपास दीड हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यात चालक, वाहक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे गत पाच दिवसांपासून आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. एकीकडे दिवाळीनिमित्त हाेणारे एस.टी. महामंडळाचे राेजचे ४५ लाखांचे उत्पन्न बुडत आहे; तर दुसरीकडे प्रवाशांना बाहेरगावी जाताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.भंडारा येथून नागपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या माेठी असते. रात्री ९.३० पर्यंत दर १५ मिनिटांनी एस.टी. बस असते. प्रत्येक बस प्रवाशांनी खच्चून भरून जाते. मात्र आता संप असल्याने प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. संपाचा गैरफायदा घेत खासगी वाहतूकदारांनी भंडारा-नागपूर तिकीट २०० ते २५० रुपये केले आहे. त्यातही जनावरांप्रमाणे प्रवाशांना काेंबले जात आहे. नाइलाज असल्याने प्रवासी बाेलायला तयार नाहीत. भंडारासाेबतच साकाेली, तुमसर, गाेंदिया, पवनी या मार्गावरही एसटीची प्रवासी वाहतूक असते. त्रिमूर्ती चाैकात तर खासगी वाहतूकदार जाेरजाेराने ओरडून गावाचे नाव घेत आहेत. हा प्रकार खुलेआम सुरू असून संपामुळे परिवहन विभाग व पाेलीसही कारवाई करण्यास मागेपुढे पाहत आहेत.

बसस्थानकांत शुकशुकाट- जिल्ह्यातील तुमसर, पवनी, साकाेली आणि भंडारा बसस्थानकांत सध्या शुकशुकाट आहे. काही प्रवासी बसची एखादी फेरी निघेल या आशेने बसस्थानकात येतात; परंतु तेथे काेणतीही बस येत नाही. त्यामुळे प्रवासी बसस्थानकांवर असलेल्या खासगी वाहतूकदारांकडे धाव घेत आहेत. या संपाने एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान हाेत असून, प्रवाशांचीही लूट हाेत आहे.