शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

गावांमधील सौरदिवे ठरताहेत कुचकामी

By admin | Updated: October 28, 2014 22:53 IST

वीज बचत व विद्युत पुरवठ्याच्या कारणावरून ग्रामपंचायत स्तरावर गावात सौरदिवे लावण्यात आले. शहरापासून खूप आत असलेल्या गावांना याचा विशेष फायदा झाला. पायवाटा प्रकाशमान झाल्या.

भंडारा : वीज बचत व विद्युत पुरवठ्याच्या कारणावरून ग्रामपंचायत स्तरावर गावात सौरदिवे लावण्यात आले. शहरापासून खूप आत असलेल्या गावांना याचा विशेष फायदा झाला. पायवाटा प्रकाशमान झाल्या. परंतु बॅटरीच्या सुरक्षेचा अभाव राहिल्याने अल्पावधीतच गावातील सौरदिवे आणि त्यातील बॅटरी अज्ञातांनी चोरून नेल्याने हे सौरदिवे सध्या कुचकामी ठरत आहेत. तसेच यातील बिघाड दुरुस्त करण्याचीही व्यवस्था नसल्यानेही ते निकामी ठरत आहेत. पंचायत समितीतील ग्रामपंचायत स्तरावर गावांना सौरदिव्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक गावातील लोकसंख्या लक्षात घेऊन वॉर्डनिहाय सौरदिवे लावण्यात आले. सौरदिव्यांच्या खांबावर सौर बॅटरीचीही व्यवस्था करण्यात आली. परंतु काही महिन्याच्या कालावधीतच काही ठिकाणी सौर बॅटऱ्यांची अज्ञातांकडून चोरी व्हायला लागली. तर अनेक ठिकाणी यात तांत्रीक बिघाड आला. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये प्रमुख चौकात, नवीन वस्त्यात त्याचबरोबर ज्या वॉर्डामध्ये विद्युतची सुविधा नाही अशा ठिकाणी सौरदिव्यांची उभारणी करण्यात आली. मात्र संधीचा फायदा घेत अज्ञाताकडून बॅटऱ्यांची चोरी करण्याचा सपाटा सुरु झाला. त्याचप्रकारे अनेक सौरदिव्यांमध्ये तांत्रिक बिघाड आला. तो दुरुस्त न केल्यानेही गावांमध्ये भर चौकात अंधार पहावयास मिळत आहे. शासनाने ग्रामीण भागात सौरदिवे लावल्याने वारंवार खंडीत वीज पुरवठ्याचा कुठलाही फरक ग्रामस्थांना पडत नव्हता. अनेक सौरदिवे भर पावसातही लाईन गेल्यावर सुरु असायचे. अनेक गावात व्यवस्थित वीज पुरवठा आजही होत नाही. अशा ठिकाणी हे सौरदिवे खूपच फायद्याचे ठरत होते. परंतु बिघाड आणि चोरी या कारणाने एक चांगली व्यवस्था कुचकामी ठरू पाहत आहे. यातील बिघाड दुरुस्तीसाठी वरिष्ठांना सांगणे गरजेचे आहे. परंतु तसे होत नसल्याने गावामधील सौरदिवे कुचकामी ठरत आहे. (नगर प्रतिनिधी)