शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

नळातून निघाला साप !

By admin | Updated: May 31, 2016 00:37 IST

शीर्षक वाचून दचकलात ना! परंतु हे खरे आहे. शहरातील राजेंद्र वॉर्डातील शुक्रवारी परिसरातील रहिवाशी अनिल श्रावण गौरी यांच्या घरी ...

शुक्रवारी वॉर्डातील प्रकार : लोकप्रतिनिधी एकत्र का येत नाहीत?भंडारा : शीर्षक वाचून दचकलात ना! परंतु हे खरे आहे. शहरातील राजेंद्र वॉर्डातील शुक्रवारी परिसरातील रहिवाशी अनिल श्रावण गौरी यांच्या घरी सोमवारी सकाळी ७.२० वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा परेश हा पाणी भरत होता. यावेळी नळातून चक्क साप आल्याने त्याची भंबेरी उडाली. आजपर्यंत नारू आल्याचे ऐकिवात आहे. मात्र नळाच्या पाण्यातून चक्क साप निघाला. ही वार्ता परिसरात पसरताच या सापाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला सोडण्यात आले. मागील दोन वर्षापासून भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या वैनगंगेत नागनदीचे मलमुत्रयुक्त पाणी येत असल्यामुळे वैनगंगा नदी दूषित झाली आहे. याच नदीतून शहराला पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागनदीचा प्रवाह बदलविण्यात यावा या मागणीसाठी विविध संघटनांनी पुढाकार घेतला असला तरी नागनदीचे पाणी वैनगंगा नदीत येणे थांबविण्यात आलेले नाही. आधीच शहरातील पाईपलाईन जीर्ण असल्यामुळे ठिकठिकाणी दूषीत पाण्याचा पुरवठा होतच आहे. याशिवाय मागील तीन महिन्यांपासून या नदीत ‘इकार्निया’ या जलजन्य वनस्पतीने डोके वर काढल्यामुळे संपूर्ण नदीपात्र या वनस्पतीने आच्छादले आहे. ही वनस्पती दररोज कित्येक पटीने वाढत आहे. परंतु कमी होण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. मागील रविवारी लाखनी येथील एका इसमाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. ईकार्निया ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यांचा मृतदेह तीन दिवसांनंतर नदीपासून तीन कि.मी. अंतरावर आढळून आला.(जिल्हा प्रतिनिधी)आणखी किती सहन करायचे?भंडारा शहराला याच वैनगंगा नदीतून पाण्याचा पुरवठा होतो. मागील दोन वर्षांपासून येथील नागरिकांना दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सर्वांनाच दूषीत पाण्याचा पुरवठा होत असला तरी सधन नागरिकांनी आरओ लावून घेतले आहेत. यात गरीब बळी पडत आहे. गरिबांना दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. अशा स्थितीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाही लोकप्रतिनिधी, नगर पालिका पदाधिकारी केवळ निवेदने देत आहेत. निवेदने देण्याची ही वेळ नाही. ही गंभीर समस्या निराकरणासाठी एकत्र येऊन पुढाकार घेण्याची गरज आहे. नागरिकांच्या संयम सुटण्याचा अंत कुणी पाहू नये.