शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सुरूच

By admin | Updated: July 21, 2014 00:02 IST

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर आणि धूम्रपानावर प्रतिबंध आहे. तरी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे आणि धूम्रपान करण्याचे प्रमाण कमी झाले नाही. तथापि प्राणघातक आजाराची लागण होवू नये,

राजू बांते - मोहाडी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर आणि धूम्रपानावर प्रतिबंध आहे. तरी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे आणि धूम्रपान करण्याचे प्रमाण कमी झाले नाही. तथापि प्राणघातक आजाराची लागण होवू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्थ सर्व संस्थांमध्ये थुंकण्यास मनाई करण्यात यावी तसेच कलम ११६ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ जुलै रोजी परिपत्रक जारी केला आहे.केंद्र शासनाच्या सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २०३ च्या कलम ४ मधील तरतूदीनुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर प्रतिबंध करण्यात आला आहे. १८ जुलै २०१३ अनुसार लोकांच्या आरोग्य हितासाठी स्वादिष्ट सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट सुगंधित सुपारी यांची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्री करण्यास प्रतिबंध करण्याची अधिसूचना काढण्यात आली. तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ११६ मधील तरतुदीनुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर व धूम्रपानावर प्रतिबंध करण्यात आला आहे. अधिनियमान्वये प्रतिबंध असला तरी व दंडात्मक कारवाई होत असली तरी राजरोसपणे अधिनियम तुडविला जात आहे. थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विद्रूप होते. शिवाय क्षयरोग, स्वाईन फ्लू, न्युमोनिया यासारख्या आजाराचा फैलावही थुंकीमार्फत होतो. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम २०१२ च्या वार्षिक अहवालानुसार देशातील ३ दशलक्ष लोक क्षयरोगाने पीडित आहेत. त्यातील महाराष्ट्रात ७५ हजार ३१९ लोकांना क्षयरोगाचा आजार झाला आहे. या आजारामुळे महाराष्ट्रात ६ हजार ६९२ लोकांचे मृत्यू झाले. भारतात क्षयरोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ३ लक्ष आहे. हा सगळा प्रकार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांमध्ये तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थ चघळल्यामुळे थुंकणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.मुंबई पोलीस अधिनियमनातील थुंकण्यावर प्रतिबंध कलमाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण निश्चितपणे कमी होणार आहे.