शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मर्यादा

By admin | Updated: June 13, 2015 00:45 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राखीव प्रवर्गातून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना नामांकन ...

पडघम निवडणुकीचे : सुधारीत आदेश धडकलेभंडारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राखीव प्रवर्गातून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना नामांकन अजार्सोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अटीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मात्र, ज्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांनी नामांकन अर्ज भरतांना उमेदवारांनी जात वैधता पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती किंवा कोणताही पुरावा अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील. राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सार्वत्रिक किंवा पोट निवडणूकांकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिनांक ३१ डिसेंबर २०१५ हा किंवा त्यापूर्वीचा असेल. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाच्या कलम १२-अ, कलम -४२ (६-अ), कलम -६७(७-अ) मध्ये सुधारणा केली आहे. ज्यांनी नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकापूर्वी आपल्या जातीच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी अर्ज केला असेल परंतु नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दिनांकाला वैधता प्रमाणपत्र मिळालेले नसेल, अशांनी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे असा अर्ज केला असल्याबाबतचा कोणताही पुरावा असणे आवश्यक राहील. जी व्यक्ती निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या मुदतीत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील याबाबतचे हमीपत्र द्यावे लागेल. जी व्यक्ती निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसुर केल्यास त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्य झाली असल्याचे मानण्यात येईल. ती व्यक्ती सदस्य राहण्यास निरर्ह ठरेल. अध्यक्ष व सभापती पदासाठी राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या सदस्यांनाही सदर सुधारणा लागू राहणार आहे. (नगर प्रतिनिधी)