शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त भरारी पथकाने घातली कृषी केंद्रांसह दुकानांवर धाड

By admin | Updated: September 21, 2014 23:46 IST

जीवनावश्यक वस्तूंसह खतांचा काळाबाजार करून ज्यादा किमतीने विक्री प्रकरणी भंडारा येथील गुणवत्ता नियंत्रण भरारीपथकाने धाड मारून एकाला अटक केली. चिखला, नाकाडोंगरी व गोबरवाही

तुमसर : जीवनावश्यक वस्तूंसह खतांचा काळाबाजार करून ज्यादा किमतीने विक्री प्रकरणी भंडारा येथील गुणवत्ता नियंत्रण भरारीपथकाने धाड मारून एकाला अटक केली. चिखला, नाकाडोंगरी व गोबरवाही परिसरात शुक्रवारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. या भरारी पथकात कृषी विभागाचे अधिकारीही होते. ही सर्व कारवाई गुप्त ठेवण्यात आली हे विशेष.शुक्रवारी तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरातील गोबरवाही, चिखला व नाकाडोंगरी येथे भंडारा येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची धाड मारली. यात नाकाडोंगरी येथील एकाला अटक करण्यात आली आहे. चिखला व इतर ठिकाणी कारवाई झाल्याचे समजते. अधिकाऱ्यांनी गोबरवाही पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी पथकासोबत घेतले होते. तुमसर येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांना या पथकाबद्दल विचारले असता भरारी पथक तालुक्यात भंडाऱ्यावरून आपल्याची माहिती दिली. परंतु कारवाईबद्दल माहिती नाही असे सांगितले.गोबरवाई येथील पोलीस निरीक्षक वाढीवे यांना विचारले असता पथकातील अधिकाऱ्यांनी दोन पोलिसांची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना दोन पोलीस शिपाई दिले होते. कारवाईबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. पथकातील गुणवत्ता नियंत्रण अधिकारी कावळे यांना विचारले असता मी सध्या नागपूर येथे पोलीस ठाण्यात आरोपीसह असून कारवाई सुरु असून व्यस्त असल्याचे सांगितले. या परिसरात मागील अनेक महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू रॉकेल, घरगुती गॅस सिलिंडर व खतांचा सर्रास काळाबाजार सुरु आहे. एका तक्रारीच्या आधारावर ही कारवाई झाल्याची माहिती आहे.या परिसरात काळाबाजार सुरु आहे. शुक्रवारी कारवाईनंतर या परिसरात एकच खळबळ माजली होती. सदर प्रकरण दाबण्याकरिता ही मोठ्या हालचाली करण्यात आल्याचे समजते. परंतु भरारी पथकाने शेवटी कारवाई केली. या प्रकरणात मूळ मोठे मासे या पथकाच्या गळाला लागणार काय, हा मुख्य प्रश्न आहे. या प्रकरणात कोणती कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)