‘त्या’ दुकानदाराकडे मूळ डी-वन रजिस्टरच नाही

By Admin | Updated: April 21, 2017 00:41 IST2017-04-21T00:41:17+5:302017-04-21T00:41:17+5:30

मोरगाव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराकडे मुळचा डी-वन रजिस्टर नाही. प्रमाणित न केलेला चौकशी

The shopkeeper does not have the original D-forest register | ‘त्या’ दुकानदाराकडे मूळ डी-वन रजिस्टरच नाही

‘त्या’ दुकानदाराकडे मूळ डी-वन रजिस्टरच नाही

चौकशीला दिरंगाई : चौकशी अधिकारी आल्यापावली परतले
मोहाडी : मोरगाव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराकडे मुळचा डी-वन रजिस्टर नाही. प्रमाणित न केलेला चौकशी अधिकाऱ्यांनी आनलेला डी-वन वर गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. धान्य दुकानदारांनी बनावट डी-वन सादर करुन दिशाभूल केली आहे. तथापि, या चौकशी प्रकरणात होणारी दिरंगाईच खूप खोलवर अनियमिततेचा पाणी मूरत असल्याचे दिसून येत आहे.
सरकारी स्वस्त धान दुकानदाराचे मागील सहा वर्षापासून बनावट नावाने अधिकचा धान्य साठा उचलून शासकीय कोष आपल्या घशात घातले. याचा बिंग गावकऱ्यांनी २७ मार्च रोजी तहसील कार्यालयात तहसीलदारांसमोर उघड केला. याआधी लेखी, तोंडी निवेदन देवूनही प्रशासनाने दखल घेतली नव्हती. त्यामुळे मोरगाववासियांनी तहसीलमध्ये ठाण मांडून एल्गार पुकारला होता. त्यानंतर त्याच दिवशी मौका पंचनामा करण्यात आला. धान्य साठा पोलीस पाटलांकडे हस्तातरीत करण्यात आला. कासवगतीने चौकशी होत राहीली. मोरगावचे दुकान मोहाडीला जोडण्यात आले. दुकानदारांनी दस्ताऐवज काही दिवसांनी तहसील कार्यालयात जमा केले. पण, मुळ डी-वन रजिष्टर जमा झालाच नाही.
गावातील किती शिधापत्रिकाधारकांना अन्न-धान्य प्राप्त झाले. बनावट शिधापत्रिका किती याचा शोध घेण्यासाठी तलाठयांकडून चावडी वाचन ठेवण्यात आली. पण, मूळ डी-वन रजिष्टर नसल्याने चावडी वाचन होवू शकली नाही. बनावट डी-वन आणण्यात आला होता. त्यावर कोणत्याही अधिकाऱ्यांनी प्रति स्वाक्षरी नव्हती. गावकऱ्यांनी आधी मूळ डी-वन आना नंतरच पुढची चौकशी होईल अशी भूमिका घेतली आहे. त्यानंतरही पुरवठा निरीक्षक सागर बावरे व कोतवाल चंदन नंदनवार चौकशीला गेले. पण त्यांना आल्या पावली परतावे लागले. चौकशी तीन दिवसात करु असे सांगणारे अधिकारी एक महिना लावत आहेत. गावकऱ्यांनी आयुक्ताची भेट घेतली. चौकशी संबधात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा पत्र आलाय. पण, अंतिम निकालापर्यंत चौकशी का जात नाही याबाबत गावकऱ्यांच्या शंकेला जागा मिळाली आहे. गावकऱ्यांनी २४ एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे ठरविले आहे. चौकशी अहवाल तयार करण्यात आला असून दुकानदाराला दोषी ठरविण्यात आल्याचे वृत्त आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The shopkeeper does not have the original D-forest register