शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी करा मनसोक्त, पण कोरोना नियमांचे भान ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

गतवर्षी दिवाळीनंतरच महाभयानक दुसरी लाट आली होती. रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना संपला नाही. त्यामुळे खरेदी करताना कोरोना नियमांचे भान ठेवण्याची गरज आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी भंडारा शहरासह तालुका ठिकाणच्या बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे. प्रत्येक जण दिवाळीसाठी हात सैल सोडून खरेदी करीत आहे. यामुळे सकाळी १० वाजतापासून रात्री उशिरापर्यंत बाजारात गर्दी असते. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुसरी लाट ओसरल्यानंतर कोरोनाची रुग्णसंख्या एकदम कमी झाली. प्रशासनासह नागरिकांनाही मोठा दिलास मिळाला. आता दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. त्यातच प्रशासनाने सर्व दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत नागरिक मनसोक्त खरेदी करणार आहे. गतवर्षी दिवाळीनंतरच महाभयानक दुसरी लाट आली होती. रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना संपला नाही. त्यामुळे खरेदी करताना कोरोना नियमांचे भान ठेवण्याची गरज आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी भंडारा शहरासह तालुका ठिकाणच्या बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे. प्रत्येक जण दिवाळीसाठी हात सैल सोडून खरेदी करीत आहे. यामुळे सकाळी १० वाजतापासून रात्री उशिरापर्यंत बाजारात गर्दी असते. भंडारा शहरातील मेन लाईन मोठ्या बाजारमध्ये तर गत दोन दिवसांपासून तुफान गर्दी झाली आहे. अनेक दुकानात पाय ठेवायला जागा नाही. त्यातच आता प्रशासनाने शुक्रवारी आदेश निर्गमित करून रात्री ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा व्यापारी आणि ग्राहकांना होणार आहे. परंतु खरेदी करताना सद्य:स्थितीत कुणीही कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाही. मास्क तर बेपत्ताच झाला आहे. फिजिकल डिस्टन्सिंगही कोणी पाळत नाही. अशा स्थितीत कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. परंतु दिवाळीच्या आनंदापुढे कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. सहकुटुंब दिवाळीची खरेदी करीत आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग जवळजवळ नाहीत जमा आहे. जिल्ह्यात केवळ चार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे सर्व जण बिनधास्त झाले आहे. मात्र, होणारी गर्दी प्रशासनाला चिंतेत टाकणारी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना खरेदी करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच व्यावसायिकांवर लक्ष ठेवण्यासाठी पथक गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु यानंतरही बाजारात कुणी कुणाचे ऐकायला तयार नाही.

नियमांना तिलांजली धोक्याची घंटाकोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्येक जण भयभीत होता. मास्क लावून आणि सॅनिटायझर सोबत ठेवूनच बाहेर पडत होता. परंतु आता असे चित्र कुठेही दिसत नाही. नाकावरून हनुटीवर आणि तेथून मास्क बेपत्ता झाला आहे. कुणीही मास्क लावताना दिसत नाही. शासकीय कार्यालयात जायचे असेल तर खिशात मास्क बाळगणारे अनेक जण आहे. गर्दी करून खरेदी करणे आणि नियमांना तिलांजली देणे धोक्याची घंटा ठरू शकते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार