सत्यसाई महाविद्यालयात शिवाजी महाराज जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:23 IST2021-02-22T04:23:43+5:302021-02-22T04:23:43+5:30

जवाहरनगर : परसोडी येथील ओम सत्यसाई कला, विज्ञान महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या ...

Shivaji Maharaj Jayanti at Satyasai College | सत्यसाई महाविद्यालयात शिवाजी महाराज जयंती

सत्यसाई महाविद्यालयात शिवाजी महाराज जयंती

जवाहरनगर : परसोडी येथील ओम सत्यसाई कला, विज्ञान महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दिलीप पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मिथुन मोथरकर, प्रा. महादेव हटवार, प्रा. चेतन हटवार, प्रा. विनोद हजारे, प्रा. चंद्रमुनी रंगारी, प्रा. प्रतीक घुले, प्रा. हर्षानंद वासेकर, प्रा. ईश्वरलाल पालीवाल, प्रा. ममता वाडीभस्मे, प्रा. आशा आकरे, प्रा. वर्षा दंडारे, प्रा. वर्षा भुरे, प्रा. सुप्रिया वाडीभस्मे उपस्थित होते. प्राचार्य पाटील यांच्या हस्ते ‘शिवछत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या हस्ते पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. संचालन प्रा. वर्षा भुरे यांनी केले. आभार प्रा. प्रतीक घुले यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षकेतर कर्मचारी महादेव खंडाळे, रामकृष्ण आकरे, कुमुद गोस्वामी, संध्या उरकुडे, तुलाराम वासनिक, दीपक आकरे, राजेश चोपकर, चंदा शेंडे यांनी सहकार्य केले.

Web Title: Shivaji Maharaj Jayanti at Satyasai College