शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ आली आणि पिलाला तोंडात पकडून जंगलात घेऊन गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 05:00 IST

पवनी तालुक्यातील चकारा येथे पाटबंधारे विभागाच्या पडक्या इमारतीत बुधवारी सकाळी बिबट्याचा नवजात बछडा आढळून आला होता. वन विभागाने तेथे धाव घेतली. याच परिसरात बिबट असल्याने तो आपल्या पिलाला घेण्यासाठी येईल, अशी अपेक्षा होती. त्यावरूनच अड्याळ वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे व वनकर्मचाऱ्यांनी परिसरात गस्त वाढविली. तसेच दोन ट्रॅप कॅमेरे लावले.

ठळक मुद्देचकारा परिसरात बिबट कॅमेऱ्यात ट्रॅप

लाेकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पाटबंधारे विभागाच्या पडक्या इमारतीत बुधवारी बिबट्याचा बछडा आढळून आला होता. वन विभागाने त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून मादी बिबटाची प्रतीक्षा सुरू केली होती. बुधवारी सायंकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी ती आली आणि पिलाला तोंडात पकडून जंगलाच्या दिशेने निघून गेली. हे दृश्य ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले. परिसरात बिबटाचे वास्तव्य असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.पवनी तालुक्यातील चकारा येथे पाटबंधारे विभागाच्या पडक्या इमारतीत बुधवारी सकाळी बिबट्याचा नवजात बछडा आढळून आला होता. वन विभागाने तेथे धाव घेतली. याच परिसरात बिबट असल्याने तो आपल्या पिलाला घेण्यासाठी येईल, अशी अपेक्षा होती. त्यावरूनच अड्याळ वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे व वनकर्मचाऱ्यांनी परिसरात गस्त वाढविली. तसेच दोन ट्रॅप कॅमेरे लावले. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ट्रॅप कॅमेऱ्यांची तपासणी केली तेव्हा बुधवारी सायंकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी आपल्या बछड्याला तोंडात पकडून नेत असल्याचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बुधवारी दिवसभर या बिबटाचीच चर्चा परिसरात होती. पडक्या वसाहत परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी पांगविण्यासाठी वनविभागाला मोठी कसरत करावी  लागली. वनविभागाचे अधिकारी परिसरात तळ ठोकून होते.

परिसरात भीतीचे वातावरण- चकारा येथील मोडक्या इमारतीत बिबट्याचा बछडा आणि सायंकाळी त्या बिबट्याला घेऊन जाणारी मादी कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे परिसरात बिबट्याचे वास्तव्य सिद्ध झाले. परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी अड्याळ येथे एक अस्वल शिरली होती तर दुसऱ्या दिवशी चिचाळ येथील शेतमजुरावर हल्ला केला होता. आता बिबट आणि तिचे बछडे असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे.- अड्याळ आणि परिसरात मोठ्या प्रमाणात हिंस्त्र वन्यजीवांचे वास्तव्य दिसून येत आहे. लगतच्या अभयारण्यातून ही जनावरे अड्याळ परिसरात पाणी आणि चाऱ्याच्या शोधात येत आहेत. गोसे धरण आणि उमरेड कऱ्हांडला अभयारण्य यामुळे मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत. दहा वर्षापूर्वी क्वचित दिसणारे वन्यप्राणी आता ठिकठिकाणी दिसून येत आहेत. कवलेवाडा शिवारात दोन बिबट विहिरीत पडून मृत्युमुखी पडण्याची घटनाही ताजी आहे.

 

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग