शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

४८ तासात सात अर्भकांचा मृत्यू!

By admin | Updated: October 4, 2014 23:21 IST

गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळखले जाणाऱ्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान मागील ४८ तासात सात अर्भकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

सामान्य रूग्णालयातील प्रकार : रूग्णालयाकडून प्रकरणावर पडदाभंडारा : गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळखले जाणाऱ्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान मागील ४८ तासात सात अर्भकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.हलाखीच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक गरीब रूग्ण शासकीय रूग्णालयात औषधोपचार घेतात. त्यातील अनेकांवर स्थानिक शासकीय रूग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यास त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात रेफर केले जात आहे. मागील ४८ तासांपूर्वी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी ग्रामीण भागातून आलेल्या काही गर्भवतींनी बाळांना जन्म दिला. त्यानंतर त्यातील काही अर्भकांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून औषधोपचार करण्यात आले. तर काही रेफर टू भंडारा करण्यात आलेल्या नवजात बालकांवर उपचार करण्यात आले.मागील ४८ तासात जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या अर्भकांपैकी सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. यातील काही बालक वॉर्ड क्रमांक १०, ११ मधील तर काही अर्भक १२ मधील होते. याबाबत सामान्य रूग्यालयात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता येथील परिचारीकांनी बालकांचा मृत्यू हा रोजच होत असून रूग्णालयासाठी हा नविन प्रकार नसल्याचे सांगून या गंभीर विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. प्रकरणातील सत्यता बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता रूग्णालय प्रशासनाकडून या प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रकरणाची सत्यता बाहेर आल्यास रूग्णालयाचे पितळ उघडे पडण्याची भिती निर्माण झाल्याने माहिती दडवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची सुश्रूशा करण्याचे एकमेव केंद्र म्हणून जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे बघितले जाते. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालय, सामान्य रूग्णालय व उपकेंद्रात नागरिकांवर शासनाकडून मोफत आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहे. आरोग्य साहित्य व औषधांच्या साठ्याचा पुरवठा अनियमित होत असल्याने रूग्णांचे बेहाल होत आहे. त्यामुळे अनेक रूग्ण शासकीय दवाखान्याऐवजी खासगी रूग्णालयाकडे धाव घेत आहेत. (शहर प्रतिनिधी)