शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सात शेतकरी कन्या विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 00:22 IST

पवनी नगरातील सामूहीक विवाह सोहळ्याची परंपरा गतवर्षापासून सुरु ठेवण्यासाठी छावा संग्राम परिषद व बेलघाटा व बस्तरवारी ....

छावा संग्राम परिषद व मंदिर पंचकमेटीचा उपक्रम अशोक पारधी पवनी पवनी नगरातील सामूहीक विवाह सोहळ्याची परंपरा गतवर्षापासून सुरु ठेवण्यासाठी छावा संग्राम परिषद व बेलघाटा व बस्तरवारी वॉर्डातील मंदिर पंचकमेटीने एकसंघ होऊन विवाह सोहळा आयोजित केला. हजारो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत सात शेतकरी कन्या विवाहबद्ध झाल्या. या स्तुत्य उपक्रमासाठी उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.बेलघाटा वॉर्डातील संताजी मंगल कार्यालयाचेप्रांगणात आयोजित या सामूहीक विवाह सोहळ्याचे उद्घाटन नगराध्यक्ष पुनम काटेखाये यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये होते. याप्रसंगी आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, माजी नगराध्यक्ष डॉ.प्रकाश देशकर, पालिकेचे उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर, सभापती नरेश तलमले, सभापती अनुराधा बुराडे, नगरसेवक प्रियांका जुमळे, निर्मला तलमले, शहजादा बेग, माजी उपाध्यक्ष धर्मेंद्र नंदरधने, दुधराम कळंबे, आझाद शेतकरी संघटनेचे किशोर पंचभाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ.अनिल धकाते, नगरसेवक शोभना गौरशेट्टीवार, डॉ.भागवत आकरे, डी.आर. पडोळे, हिरामण जुमळे, पंकज रेवतकर, पुरुषोत्तम तलमले उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्य संयोजक राजेश तलमले यांनी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करून शेतकरी कन्यांचे लग्न लावून देण्याची परंपरा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी आमदार रामचंद्र अवसरे यांनी नवदाम्पत्यांना शिलाई मशिन भेट देणार असल्याचे सांगितले. यावेळी डॉ.प्रकाश देशकर, विलास काटेखाये, धर्मेंद्र नंदरधने यांनी मार्गदर्शन केले. संचालन नामदेव सुरकर यांनी तर आभार ज्ञानेश्वर वाघमारे यांनी मानले.