शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
2
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
3
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
4
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
5
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
6
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
7
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
8
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
9
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
10
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
11
ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
12
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
13
IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
14
दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?
15
NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
16
Katie Archibald: रुग्णांची सेवा करण्यासाठी स्पोर्ट्स करिअरवर सोडलं पाणी; स्टार खेळाडूची जगभरात चर्चा!
17
कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
18
Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
19
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
20
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीचा सेवाभावी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील ११ शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी त्या त्या गावातील गरजु लोकांना भाजीपाला विनामूल्य पुरवठा करीत आहेत. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तंच्या ७०० कीट तयार झालेल्या असून ४५० कीटचे वाटप झालेले आहेत. जिल्ह्यातील दानशूर शेतकऱ्यांनी जवळपास ५५० क्विंटल भाजीपाला गरजू लोकांना विनामूल्य वाटप केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कृषी विभाग आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादन कंपनी कार्यरत असून दररोज शासनाकडून मागणीप्रमाणे जीवनावश्यक वस्तंूची किट तयार करणे, गरजू रेशन कार्ड नसणारे व बेघर लोकांना विनामूल्य भाजीपाला पुरवठा करण्याचे काम लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर करीत आहे.
जिल्ह्यातील ११ शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी त्या त्या गावातील गरजु लोकांना भाजीपाला विनामूल्य पुरवठा करीत आहेत. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तंच्या ७०० कीट तयार झालेल्या असून ४५० कीटचे वाटप झालेले आहेत. जिल्ह्यातील दानशूर शेतकऱ्यांनी जवळपास ५५० क्विंटल भाजीपाला गरजू लोकांना विनामूल्य वाटप केला आहे.
गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर यांचे मार्फत शेतकरी सदस्यांचे धान्य व इतर जीवनावश्यक वस्तु घेवून कंपनीमध्ये एकत्रित करुन कीट बनविण्याचे काम कंपनीद्वारे केले जात आहे. यासाठी कोणत्याही स्वरुपाचा मोबदला न घेता विनामूल्य कीट तयार करुन माविमंचे जिल्हा समन्वयक अधिकारी प्रदीप काठोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित तहसीलदारांकडून जीवनावश्यक वस्तुंच्या कीटची मागणी झाल्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी येथून सदर किट प्राप्त करुन घेवून गरजू, रेशन कार्ड नसणारे व बेघर लोकांना व तालुकास्तरावरील माविमचे व्यवस्थापक यांचे मार्फत घरपोच कीटचे वाटप करण्यात येत आहे. कंपनीचे अध्यक्ष संजय एकापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तु कीट बनविण्याचे काम तालुक्यातील जाख येथे अविरत सुरु आहे. या जीवनावश्यक वस्तुंच्या कीटमध्ये पाच किलो तांदुळ व गहू, अर्धा किलो तूर डाळ व तेल, २०० ग्रॅम मिरची पावडर, १०० ग्रॅम मसाला, अर्धा किलो मिठ व एक मास्क या जीवनावश्यक वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रोत्साहित केले आहे.
 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती