शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बडतर्फ कर्मचाऱ्यांची कुटूंब सुरक्षा योजनेअंतर्गत नेमणूक

By admin | Updated: September 26, 2016 00:49 IST

राज्य परिवहन सेवेतुन बडतर्फे झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयाची आर्थिक कुंचबना थांबवावी यासाठी

कुचंबणा थांबविण्यासाठी योजना : राज्य परिवहन विभागाचा निर्णयसंजय साठवणे  साकोलीराज्य परिवहन सेवेतुन बडतर्फे झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयाची आर्थिक कुंचबना थांबवावी यासाठी गैरहजेरीच्या कारणास्तव बडतर्फे झालेल्या कर्मचाऱ्यास कुटूंब सुरक्षा योजनेंतर्गत कटी व शर्तीनुसार पुर्ननेमणूक देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता बडतर्फे कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार आहे. हा निर्णय बडतर्फे कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांची कुचंबना होऊ नये या अनुषंगाने घेण्यात आला आहे.१ एप्रिल रोजी झालेल्या राज्य परिवहन संचालक मंडळाच्या बैकीमध्ेय पारित झालेल्या महामंडळ ठराव नुसार १ एप्रिल २०१६ रोजी ४५ वर्षापेक्षा जास्त वय नसलेल्या गैरहजेरीच्या कारणास्तव बडतर्फे झालेल्या कर्मचाऱ्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून पुर्ननेमणूक देण्यात येणार आहे. नवीन नेमणुक देतांना त्यांना गैरहजेरीच्या कारणास्तव बडतर्फे केले असल्याने तसेच बडतर्फीनंतर राज्य परिवहन नियमानुसार त्यांना त्यांची मागील सेवेचा कोणताही आर्थिक व प्रशासकीय लाभ त्यांना देण्यात येणार नाही, गैरहजेरीच्या कारणावरुन बडतर्फी संदर्भात न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास सदर प्रकरण परस्पर सामंजस्याने न्यायालयातून मागे घेण्याच्या अधीन राहून तसेच त्याची मागील देय रक्कम अदा केल्यानंतरच सदर कर्मचाऱ्यास कुटूंब सुरक्षा योजनेंतर्गत पुर्णनेमणूक देण्यात येणार आहे. पुर्ननियुक्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्याला मागील सेवेचा कोणत्याही प्रकारचा लाभाची मागणी करता येणार नाही, तसेच सलग सेवेचा कोणताही लाभ मिळणार नाही, न्यायालयात दाद मागता येणार नाही, तसेच हा सर्व प्रकार त्यांच्याकडून लिहून घेण्यात येणार आहे, वैद्यकिय तपासणी करण्यात येणार आहे, आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल, आरक्षणानुसार व रिक्त जागानुसार नेमणुक करण्यात येणार आहे. यासारख्या अनेक अटी व शर्ती लावण्यात असुन या अटी व शर्तीच्या आधारे प्रकरणी बडतर्फे झालेल्या वाहकांना सुध्दा याच योजनेअंतर्गत पुर्ण नेमणूक देण्यात येणार आहे व त्याही कर्मचाऱ्याला याच अटी व शर्तीचे आधारे पुर्ननेमणूक करण्यात येणार आहे. सदर निर्णयाची प्रत आगार व्यवस्थापक भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा व पवनी यांना प्राप्त झाले आहेत.