शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री

By admin | Updated: October 28, 2014 22:51 IST

गरिबांना अल्प दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर योजना आखण्यात येतात. असे असले तरी शासकीय स्वस्त धान्य दुकानातून अयोग्य पद्धतीने वाटप होत असल्यामुळे

लाखांदुरात पकडले होते रॅकेट : अन्न पुरवठा विभाग बनले मूकदर्शकलाखांदूर : गरिबांना अल्प दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर योजना आखण्यात येतात. असे असले तरी शासकीय स्वस्त धान्य दुकानातून अयोग्य पद्धतीने वाटप होत असल्यामुळे गरीबांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. याशिवाय धान्य दुकानातील हे धान्य काळ्या बाजारात विकण्याचा गोरखधंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असूनही याकडे अन्न पुरवठा विभागाचे लक्ष गेलेले नाही. मागीलवर्षी भंडारा शहरात एका धान्य दुकानावर धाड टाकून धान्य जप्त केले होते, परंतु त्यानंतर कुठलिही कारवाई करण्यात आली नाही. बीपीएलधारकांना जीवन जगण्यासाठी स्वस्त धान्याचा आधार मिळतो. मात्र अन्न पुरवठा विभागाचा गाफिलपणा तसेच काळ्या बाजारातील दलालांशी असलेले साटेलोटे यात गरिबांचा जीव गुदमरत आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय गोदामातून धान्याची उचल करण्यापासून ते परमीट पास करण्यापर्यंत अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेले आर्थिक शोषण अंत्योदयधारकांच्या जीवावर उठले आहे. अन्न पुरवठा विभागाचे अन्न वाटपाचे नियोजन कोलमडल्यामुळे त्याचा फायदा स्वस्त धान्य दुकानदारांनी घेतला आहे. परमीट पास केल्यानंतर धान्य उचल ते शिधापत्रिकाधारकांना धान्य प्रमाणात मिळते का? उचल केलेले धान्य स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहचते का? गोदामात शिल्लक साठा व वाटप साठा याची दर महिन्यात तपासणी केली जाते का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.धान्याची उचल केल्यानंतर दोन दिवसात पैशाअभावी उशिरा उचल केले तर धान्य दुकानदार धान्य संपले, असे सांगून धान्य वाटप बंद करतात. शासकीय गोदामातूनच खऱ्या अर्थाने धान्याची मोठ्या प्रमाणात अफरातफर होत असल्याचे यापूर्वी गोदाम रक्षकांकडून रंगेहात पकडून लाखांदुरात रॅकेट उघडकीस आणले होते. सरपंच व दक्षता समितीच्या सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. चौकशी केली तर साठा व वाटप यात ताळमेळ बसत नाही. यामुळेच स्वस्त धान्य दुकानदारांचे चांगलेच फावत आहे. हा सर्व प्रकार राजरोसपणे सुरू असूनही कारवाई होत नाही. गरीबांना केरोसीनची नितांत गरज असते. मात्र केरोसीन विक्रेते प्रवाशीवाहनांना जादा दराने केरोसीन विकत असल्याने गरजूंना शिधापत्रिका दाखवूनही केरोसीन स्टॉक संपले असल्याचे सांगितले जाते. परजिल्ह्यात धान्याची विल्हेवाटयेथील धान्य बाजार समिती दलालामार्फत पोहचते केले जाते. यासाठी काही अडते याचा फायदा घेतात. काही दलाल धान्याचे दर घटले किंवा वाढले तर अर्जुनी मोर येथे पाठवून खुलेआम धान्याची अफरातफर करतात. यासंबंधी अनेकदा तक्रारी केल्यावर मुद्देमालासह धान्यही पकडले. मात्र अन्न पुरवठा विभागाने मौन पाडल्याने हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)