शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
5
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
6
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
7
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
8
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
9
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
10
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
11
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
12
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
13
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
14
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
15
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
16
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गैरमार्गाविरूद्ध लढ्याचा शाळेत संस्कार

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा अवलंब करू नये यासाठी परीक्षेपूर्वी शाळेत ...

मोहाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा अवलंब करू नये यासाठी परीक्षेपूर्वी शाळेत होणाऱ्या सराव परीक्षेत गैरमार्गाविरूद्ध लढ्याचा महात्मा जोतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी शाळेत संस्कार दिले जात आहे.राज्य शिक्षण मंडळाने परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी नवनवीन उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून भरारी पथके, बैठी पथके नेमली जातात. व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. तरीही परीक्षेत गैरप्रकारांना पाहिजे त्या प्रमाणात आळा बसलेला नाही. ज्योतिबा फुले हायस्कूल मोहगावदेवीच्या शाळेत कॉपीचे आयुष्यावरील दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजून देण्याचा संस्कार सातत्याने केले जाते. शाळा अंतर्गत दहाविच्या सहा सराव परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा दरवर्षी १ डिसेंबर ते ११ फेब्रुवारी या कालावधीत मंडळाच्या धर्तीवर घेतल्या जाते. सराव परीक्षा घेण्याच्या माध्यमातून विद्यार्थी तयार होतात असा अनुभव शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी सांगितले. तथापि विद्यार्थी इंग्रजी व गणित या विषयाला घाबरत असल्याचे निर्दशनास आले. मागील सात वर्षापासून गणित व सायंस या विषयांचे तीन शिक्षकांची कमतरता असतानाही आठवड्यात मुख्याध्यापकांसह शिक्षकांना प्रत्येकी ५२ तासिकेचा बोझा उचलावा लागतो. या विपरीत परिस्थितीचा सामना करीत विद्यार्थ्यांना सरावातून घडविण्याचे कार्य सहायक शिक्षक हंसराज भडके, धनराज वैद्य, हेमराज राऊत, शोभा कोचे, गजानन वैद्य ही टीम करीत आहे. शाळेकडून घेण्यात येणाऱ्या सराव परीक्षा मंडळाच्या धर्तीवर घेण्यात येत असल्याने शाळेतच दहावी सराव परीक्षेत कॉपीमुक्त वातावरण निर्माण झाले आहे. या स्तुत्यउपक्रमाची प्रशंशा शिक्षणाधिकारी माध्यमिक के.झेड. शेंडे, गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)