शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीला परीक्षा केंद्रावरून हाकलले

By admin | Updated: April 26, 2017 00:30 IST

तुमसर येथील एका महाविद्यालयीन परीक्षा केंद्रावर कॉपी तपासताना एका परीक्षार्थी विद्यार्थिनीला कारवाईचा धाक दाखविण्यात आला.

दुसऱ्या पेपरला बसू दिले नाही : प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणीतुमसर : तुमसर येथील एका महाविद्यालयीन परीक्षा केंद्रावर कॉपी तपासताना एका परीक्षार्थी विद्यार्थिनीला कारवाईचा धाक दाखविण्यात आला. संबंधित युवतीला दुसऱ्या पेपरला बसू न देता परीक्षा केंद्रावरून परत पाठविण्यात आले. परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा आरोप या विद्यार्थिनीने केला आहे. दुर्गा जसवंत गायधने (२०) रा.बघेडा असे सदर विद्यार्र्थीनीचे नाव आहे. दुर्गा गायधने ही स्थानिक एस.एन. मोर महाविद्यालयाची नियमित विद्यार्थिनी आहे. २० एप्रिल रोजी साई महाविद्यालय परीक्षा केंद्रावर बी.एस.सी. प्रथम वर्ष बॉटनी द्वितीय सेमीस्टरचा पेपर होता. तपासणीदरम्यान दुर्गाकडे कॉपी आढळल्याचा आरोप संबंधित तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला. कारवाई करण्याची धमकी दिली. परीक्षा केंद्रावर दार बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गोंधळलेल्या व भीतीमुळे दुर्गा गायधने हीे परीक्षा केंद्रातून बाहेर पडली. रसायनशास्त्र (द्वितीय)चा पेपर देण्याकरिता दुर्गा गायधने परीक्षा केंद्रावर गेली. परंतु तिला परीक्षा केंद्रातून परत पाठविण्यात आले. याप्रकरणी दुर्गाने एस.एन. मोर महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून आपबिती सांगितली. परंतु त्यांनी या प्रकरणात मी काहीच करू शकत नाही, तू परत परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा दे, असे सांगितले. परीक्षा केंद्रावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली असा परीक्षार्थी दुर्गा गायधने या विद्यार्थिनीने आरोप केला आहे.बी.एस.सी. प्रथम वर्षाची परीक्षा न दिल्याने मला अंतिम वर्षात प्रवेश मिळणार नाही. माझे एक वर्ष वाया जाणार आहे. असे सांगून हे प्रकरण आमदार चरण वाघमारे, माजी आमदार अनिल बावनकर, सभापती शुभांगी राहांगडाले यांना दुर्गा गायधने हिने सांगितले. मागीलवर्षी सदर परीक्षा केंद्रावर मी प्रथम वर्षाची परीक्षा दिली होती. तेव्हा परीक्षा घेणाऱ्या अधिकारी पुन्हा यावर्षी सुद्धा त्याच परीक्षा अधिकारी म्हणून विद्यापीठाने त्यांची नियुक्ती केली. मागील वर्षी कॉपी संदर्भात संबंधित परीक्षा अधिकाऱ्यांशी माझी शाब्दीक बाचाबाची झाली होती. त्याचा बदला त्या महिला अधिकऱ्यांनी घेतल्याचा आरोप दुर्गा गायधने हिने केला आहे. तुमसर शहरात विद्यापीठ परीक्षा केंद्राचे तीन परीक्षा केंद्र आहेत. यात काही परीक्षा केंद्रावर कॉपी सुरू आहे. मर्जीतील परीक्षा केंद्रावर मर्जीचेच परीक्षा केंद्र प्रमुखांची नियुक्ती केल्याचे समजते. तुमसरात वास्तव्य असणारे व कर्तव्य जिल्हास्तरावर करणाऱ्यांची नियुक्ती तुमसर येथील परीक्षा केंद्रावर कशी करण्यात आली, एकाच परीक्षा केंद्रावर सलग दुसऱ्यावर्षी परीक्षा केंद्र प्रमुखपदी कशी नियुक्ती करण्यात आली हा संशोधनाचा विषय आहे. (तालुका प्रतिनिधी)