शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे तोंडाला स्कॉर्फ किंवा रूमाल बांधल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST

लाखांदूर येथे बसस्थानक असून लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात बससेवा बंद होती. त्यामुळे कुणीही बसस्थानकाकडे फिरकत नव्हते. मात्र जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली. त्यामुळे प्रवाशी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत तोंडाला मास्क बांधून प्रवास करीत आहे. त्यासाठी बसस्थानकावर जाताच मात्र बसस्थानकाच्या दर्शनी भागात असलेला फलक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो.

ठळक मुद्देप्रवाशांमध्ये संभ्रम : लाखांदूर बसस्थानकावर अफलातून फलक, परिवहन विभागाचे दुर्लक्ष

हेमंत मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी तोंडावर मास्क लावणे सक्तीचे केले आहे. मास्क न लावणाऱ्यांना दंड लावला जात आहे. प्रत्येक जण कोरोनापासून बचाव करण्यासाठी तोंडावर मास्क लावूनच बाहेर निघतात. मात्र लाखांदूरच्या बसस्थानकावर गेल्यास प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो. ‘बसस्थानक परिसरात तोंडाला स्कॉर्प किंवा रूमाल बांधून येऊ नये अन्यथा पोलीस कारवाई करण्यात येईल’, असा फलक आहे. कोरोना काळातही परिवहन विभागाने हा फलक कायम ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.लाखांदूर येथे बसस्थानक असून लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात बससेवा बंद होती. त्यामुळे कुणीही बसस्थानकाकडे फिरकत नव्हते. मात्र जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली. त्यामुळे प्रवाशी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत तोंडाला मास्क बांधून प्रवास करीत आहे. त्यासाठी बसस्थानकावर जाताच मात्र बसस्थानकाच्या दर्शनी भागात असलेला फलक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तोंडाला मास्क बांधला नाही तर २०० रूपये दंड होणार आणि बसस्थानकावर तोंडाला स्कॉर्फ किंवा रूमाल बांधून अर्थात मास्क लावून गेल्यास पोलीस कारवाई करणार.नेमके करावे तरी काय, असा प्रश्न प्रवाशांपुढे निर्माण होतो. हा फलक गेल्या कित्येक वर्षांपासून बसस्थानकाच्या दर्शनी भागात आहे. कोरोना संसर्गाच्या काळात हा फलक काढण्याची आवश्यकता होती. परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या पवनी आगाराअंतर्गत येणाºया लाखांदूर बसस्थानकावरील या फलकाकडे कुणाचेही अद्यापतरी लक्ष गेले नाही.आधार व्यवस्थापक म्हणतात हा फलक जुनालाखांदूर बसस्थानकावर असलेल्या या फलकाबाबत पवनी आगार व्यवस्थापक गुणवंत तांगडे यांच्याशी संपर्क साधला असता तो एक वर्ष आधी लावलेला फलक आहे. कोरोना काळात प्रत्येकाने मास्क, रूमाल, स्कॉर्फ बांधने आवश्यक आहे. मी हा फलक तात्काळ काढायला सांगतो, असे त्यांनी सांगितले.गत काही दिवसांपासून लाखांदूर बसस्थानकावर असलेला फलक तालुक्यात चर्र्चेचा विषय झाला आहे. येथे आलेला प्रत्येक प्रवाशाला हा फलक पाहून हसू आवरतच नाही. एसटी महामंडळाचे कर्मचारीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत मास्क लावूनच आपले कर्तव्य येथे बजावत आहेत. प्रवाशांना गोंधळात टाकणारा हा फलक एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठीही आता विनोदाचा विषय झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटी