चुल्हाडजवळ रेतीचे डम्पिंग यार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:00:20+5:30

रेतीघाटातून केलेल्या उपस्यातून चुल्हाड गावात ठिकठिकाणी रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. नदीकाठावरील मांडवी गावाच्या हद्दीत असणाºया रेतीघाटातून दिवसरात्र रेतीचा उपसा सुरु आहे. त्यामुळे परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. या घाटावरील रेती लिलावात काढण्यात येत नाही.

Sand dumping yard near Chulhad | चुल्हाडजवळ रेतीचे डम्पिंग यार्ड

चुल्हाडजवळ रेतीचे डम्पिंग यार्ड

Next
ठळक मुद्देरेतीचा दिवसभर उपसा : रेतीमाफियांचा मोर्चा मांडवी रेती घाटाकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदीकाठावरील मांडवी गावच्या हद्दीत असणाऱ्या रेतीघाटातून काही दिवसापासून रेतीचा प्रचंड उपसा सुरु आहे. रेतीघाटातून केलेल्या उपस्यातून चुल्हाड गावात ठिकठिकाणी रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. नदीकाठावरील मांडवी गावाच्या हद्दीत असणाºया रेतीघाटातून दिवसरात्र रेतीचा उपसा सुरु आहे. त्यामुळे परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. या घाटावरील रेती लिलावात काढण्यात येत नाही.
मात्र रेतीचा सुरु असलेल्या उपस्याकडे खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या रेतीघाटावरील रेती उपसाकरिता रेतीतस्करांना सोयीस्कर ठरत आहे. या घाटाशेजारी वनविभागाचे झुडुपी जंगल जागेत रेतीचे डम्पिंग यार्ड तयार करण्यात येत आहे.
वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पोहोचण्यापूर्वीच डम्पिंग यार्ड रिकामे करण्यात येतात. दिवसरात्र होणाºया रेतीउपस्यावर प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
वनविभागाने रेतीघाट बंद करण्यासाठी नाली खोदकाम करण्याची गरज आहे. गावाच्या हद्दीतून उपसा करण्यात आलेली रेती चार किमी अंतरावरील चुल्हाड गावाच्या आडोशाला डम्पिंग करण्यात येत आहे.
पिपरी चुन्ही आणि चुल्हाड गावाला जोडणाऱ्या मार्गावर डम्पिंग तयार करण्यात आले आहे. या डम्पिंगमधील विक्री तिरोडा शहरात करण्यात येत असल्याची माहिती आहे. चुल्हाड गाव शिवारात असणारा डम्पिंग यार्ड सहजरित्या कुणाच्याही निदर्शनास येत नाही.
छुप्या जागेत रेतीचा डम्पिंग यार्ड तयार करण्यात आला आहे. या रेती तस्करीमध्ये चुल्हाड पिपरी चुन्ही येथल रेती माफीयांचा सहभाग आहे. दिवसभर रेतीचा उपसा करुन रात्री रेतीची विक्री करण्यात येत असल्याने सकाळी रेतीचे ढिग दिसून येत नाही. पुन्हा दुपारपासून रेतीमाफीया रेती उपसाच्या तयारीला लागतात. प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरुन सदर प्रकार गत काही दिवसांपासून सुरु असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गावातील काही तरुणांना वेगवेगळी आमिषे देवून यामध्ये सहभागी केले जाते.

महिलांचाही सहभाग
मांडवी रेतीघाटावर अनेक रेती माफियांची नजर आहे. तामसवाडी गावच्या रेतीघाटात जागेवरुन वाद झाल्याने रेतीमाफीया नवीन जागेच्या शोधात आहे. यामध्ये अनेक महिलाही सहभागी होत आहेत. यामुळे रेतीतस्करांचे परिसरातील जाळे मजबूत होत असून त्यामुळे गावकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Sand dumping yard near Chulhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू