शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

सिलेगावात खाऱ्या पाण्याचे स्रोत

By admin | Updated: September 26, 2016 00:51 IST

अडीच हजार लोकवस्ती असलेल्या सिलेगाव येथील गावकऱ्यांना गोड व पिण्याचे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

गोड पाण्यासाठी भटकंती : अनेक त्रस्त गावकऱ्यांनी गाव सोडले, पाणी पुरवठा योजना बंदचुल्हाड (सिहोरा) : अडीच हजार लोकवस्ती असलेल्या सिलेगाव येथील गावकऱ्यांना गोड व पिण्याचे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या गावात खाऱ्या पाण्याचे स्त्रोत असल्याने प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अनेक गावकऱ्यांनी गाव सोडले आहे. स्वतंत्र नळ योजना मंजुर करण्याची ओरड गावात सुरू झाली आहे. पंचायत समिती क्षेत्र असलेल्या सिलेगाव येथील नागरिकांची पिण्याचे पाण्याची असणारी समस्या गंभीरतेने आजवर सोडविण्यात आली नाही. या गावात पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करणाऱ्या साधनाची नोंद शासकीय दस्तऐवजात आहे. यामुळे गावात पाणीटंचाई नाही, असे चित्र निदर्शनास येत आहे. या गावात विहीर व हातपंप आहेत. गावात पाण्याचा विपुल व मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. परंतु गावात उपलब्ध असणारी जलधारा पिण्यायोग्य नाही. गावात संपूर्ण गावभर खाऱ्या पाण्याचे स्त्रोत आहेत. या पाण्याचा उपयोग गावकरी आंघोड, कापड धुणे तथा अन्य कामासाठी करित आहेत. पिण्याचे पाणी गावापासून १ कि़मी. अंतरावर असलेल्या शेत शिवारातील विहीरमधून आणले जात आहेत. यामुळे या विहिरीवर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. जोड पाण्याचे स्त्रोत शेत शिवारात असणाऱ्या विहिरीत असल्याने शेतकऱ्यांचे सहकार्य गावकऱ्यांना प्राप्त होत आहे. दरम्यान गावात प्राप्त होणारे पाण्याची चव जनावरे घेत नाहीत. त्यांचे पिण्याचे पाणी याच विहिरीमधून आणले जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून गावात जटील व गंभीर समस्या गावकरी अनुभवत असताना स्वतंत्र नळ योजना मंजुरीसाठी गंभीरतेने प्रयत्न करण्यात आले नाही. गावात असणारी पिण्याचे पाण्याची प्रमुख समस्या जिल्हा प्रशासनाने सोडविली नसल्याने अनेक नागरिकांनी गाव सोडले आहे. या योजनेअंतर्गत गावकऱ्यांना पाणी प्राप्त होत असताना योजनेला विज वितरण कंपनीचा शॉक बसला आहे. अंदाजे ९ लाख रूपयाचे विजेचे देयकांची थकबाकी आहे. (वार्ताहर)